महाराष्ट्र कवी मंच*उपक्रम क्र.28 ✍🏻अक्षता अजित उपरे*
♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ *महाराष्ट्र कवी मंच* ♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ ✍🏻 *उपक्रम क्र.२८* ✍🏻 🌸 *पद्य प्रकार :- सुनीत* 🌸 *विषय - प्रेम* कोरली नावे ऐतिहासिक वास्तूवर म्हणजे का प्रेम अजरामर होतं ? खरचं या गोष्टींना प्रेमात एवढं महत्व असतं ? की फक्त दिखावा असतो वरवर राधा कृष्णाची जोडी झालीच ना अजरामर त्यांनीही केलंच होतं ना प्रेम त्याकाळी ! पण त्यांच्या प्रेमाला उपमाच नाही मुळी त्यांसम प्रेमाची भावना का नाही दिसली आजवर ? कसलीच अपेक्षा नसते मुळी खऱ्या प्रेमात हे समजणे खरचं इतके अवघड आहे का ? जिवलग आपला रहावा नेहमी सुखात अस वाटणं म्हणजे खरं प्रेम नाही का ? खरं प्रेम म्हणजे दोन आत्म्यांच मनोमिलन भिन्न देही हृदयी भासे कायम एकची स्पंदन ✍🏻 *अक्षता अजित उपरे* *पनवेल* *(रायगड)*