पत्रलेखन स्पर्धेक क्रमांक : ४१ - पल्लवी रविंद्र चव्हाण

स्पर्धक क्रमांक : ४१


नाव :- पल्लवी रविंद्र चव्हाण

शहर :- रोहा - रायगड

इंस्टाग्राम आयडी:- aathvanichisavali

इमेल आयडी :- pallavichavan1420@gmail.com



 प्रिय २०२०(कोरोना)

            २०१९ चा अंत झाला आणि २०२० ची सोनेरी पहाट उदयास आली. आम्ही साऱ्यांनीच फार उत्साहाने एक एकमेकांना व्हॉट्सअप , सोशल नेटवर्क यांच्यावर शुभेच्छा देत डिपी, स्टेटस अपलोड केले. खरंतर खूप संकल्प आणि खूप मागण्या असतात नवीन वर्षाकडून परंतू कोणालाच कल्पना नव्हती २०२० तू आम्हाला काय शिकवून जाणार.

             सुरुवातीचे दोन महिने अगदी सामान्यपणे निघून गेले आणि अचानक एक दिवस भारतात कोरोना नावाच्या विषाणूचा शिरकाव झाल्याच्या घडामोडी सुरू झाल्या आणि इथूनच खरी सुरुवात झाली ती तुझ्या २०२० च्या अस्तित्वाला. कोरोनाचा शिरकाव झाला आणि भारतात आठ दिवसांची टाळेबंदी सुरू झाली पण आठ दिवस म्हणता म्हणता ही टाळेबंदी लांबलचक दोन-तिन महिन्यांसाठी वाढतच गेली. ट्रेन,बस, मंदिर,शाळा, कार्यालये साऱ्यांनाच टाळ ठोकल गेलं.

               कोरोना विषाणूमुळे का होईना जनतेला स्वतःहून जनता कर्फ्यू पाळून घरात बसावयास भाग पाडलं. घरातील व्यक्तिशी सुसंवाद सुरू झाला. रोजच्या रहाटगाडयातून माणूस नावाच्या प्राण्याला घरातच बसून राहण्याचा विसावा मिळाला. एकत्र कुटुंबात एकत्र बसून जेवायचं आम्ही केव्हाच विसरून गेलो होतो तू पुन्हा एकदा आठवण करून दिलीस. भूतकाळातील महत्त्वाचे प्रसंग, सुख दुःखाच्या गमतीजमती यांची उजळणी नकळत घरात सुरू झाली. प्रतिकारशक्ती वाढिण्याकरिता आम्ही व्यायाम करू लागलो. आपली भारतीय संस्कृती किती महान व थोर आहे याची या विषाणू नी कळत नळकत जाणीव करून दिली जसे की बाहेरून आल्यावर हात पाय स्वच्छ धुवा. दोन व्यक्ती भेटल्यावर hi hello न करता आपले दोन्ही हात जोडून नमस्कार करून एकमेकांशी सुरक्षित अंतर ठेऊन तोंडावर मास्क लावून बोलावे. आपल्याच लोप पावत चाललेल्या भारतीय परंपरेचं दर्शन तू आम्हाला घडवत होतास. 

              टिव्ही वर positive रुग्ण आधळून येण्याचं प्रमाण दिवेसंदिवस वाढतच होत गरीब असो वा श्रीमंत कोरोनानी विळखा घातला होता. कुठेतरी आपल्याच आरोग्याखातर लढणाऱ्या डॉक्टर्स,नर्सेस, पोलिस कर्मचारी, सफाई कामगार, शेतकरी यांसारख्या देवांमुळे रूग्ण बरे होतायत याच प्रमाण दिलासा देत होतं. 

                  उद्योग धंदे बंद होते तर कुठे पोटासाठी , कामासाठी फिरताना मजुरांना पाहिले होते. मैलोनमैल अबाल वृद्ध दूर गावाकडे पायी वाट तुडवत चालले होते. २०२० तू कोणाची स्वप्न घेउन गेलास तर कोणाची माणसं परंतू काही जणांना तू माणूस असल्याची जाणीव करून दिलीस. गरीब असो वा श्रीमंताला तू पैशाचा ताळमेळ ठेवायला शिकवलंस.

                प्रिय २०२० तू जगातील सर्व मनुष्यजातीला काही प्रचंड शिक्षा आणि शिकवण शिकवून जात आहेस. जगातील सर्व मानवजातीला निसर्गाचे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून जात आहेस त्याचप्रमाणे निसर्गातील प्रत्येक घटकाबद्दल आदर आणि प्रेम याची भावना निर्माण करून जात आहेस. माणूस निसर्गाच्या विरोधात गेला की निसर्ग सुद्धा माणसावर कसा प्रहार करतो हे शिकवून जात आहेस. 

              प्रिय २०२० तू माणसाला माणूस बनून जगायला शिकवून जात आहेस.

     

                                 आपला

                            एक नागरिक

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट