पत्रलेखन स्पर्धक क्रमांक -३७ प्राजक्ता मनवेलीकर

 स्पर्धक क्रमांक -३७ 


नाव : प्राजक्ता रविंद्र मनवेलीकर

Insta id : @prmn_76 

शहर : शेवगाव 

ई -मेल : prajaktamanvelikar@gmail.com



प्रिय वाचक, 


   आज पहिल्यांदाच तुझ्याबद्दल लिहितेय , एका लेखकाच्या आयुष्यात तुझी भुमिका म्हणजे त्याच्या लेखन रूपी देहाचा तूच खरा श्वास .. 

समर्थ रामदास स्वामी म्हणतात कि वाचाल तर वाचाल ,खरच वाचाल तर जगाल . खुप काही दडलेल असत ना वाचनात म्हणूनच म्हटलं अमर्यादित लेखकांच्या लेखनाला मनमुराद दाद देणार्या तुला आज हे पत्र लिहूयात . 

लेखक तर रोज लिहीतो कधी खुप खुप चांगल तर कधी मनाला न पटणार पण तरीही अस असूनही तू त्याला खचु न देता अगदीच सुरेख ! अस सहजपणे म्हणतोस . 

तुझ्या मनाच ते दार तु लगेच बंद करतोस आणि लेखकाच्या अंतरातल दार उघडतोस . म्हणूनच म्हटलं तुझ्यासारखा तो सहजपणा आम्हांलाही जमेल का रे ? पण असो तरी हा तुझ्यासाठी लिहिण्याचा प्रयत्न . 

 तुला तर माहित असेलच ना कि लाँकडाऊनमुळे असलेल्या फावल्या वेळात काही ना काही सुचेल ते लिहित लिहित अनेक नवीन लेखक तयार झाले आहेत आणि ते नवीन अधिक जुन सगळ वाचून तु कसा रे न कंटाळता सगळ्यांनाच प्रोत्साहन देतोस अगदी पुतळ्यात सुध्दा प्राण फुंकल्यासारख .. 

   अरे! शुभ्र कागदावर कुठे लेख कुठे कविता कुठे चारोळी लिहिण सुरू झाल असेल अाणि शब्दही त्यांना कवेत घेत तुझ्यापर्यंत पोहोचण्यास अधीर झाले असतील .. सांगत असतील वाचका मी येतोय हं भेटायला घरीच रहा तु! 

तुला माहितीय वाचका तुझ्यासारख्या अनेक जणांना वाचतांना पाहिल ना कि ग्रंथालयाच्या जिवंतपणाचाच आभास होतो ,ती वेगवेगळ्या भाषेतली पुस्तक , तहानभूक हरवून पुस्तकाच्या दुसऱ्या विश्वात रमलेला तू , तर परसत्तेच्या काळी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तुझ्यात जागा झालेला तो देशभक्त ,जुन्या लेखकांच्या लेखणीला तू दिलेल आजतागायतपर्यंतच ते अमरत्व , तर वाचता वाचता तुझ एखादे वेळी लेखकात झालेल रूपांतर आणि बरच काही शब्दात न मांडता येण्यासारख .. हे सगळ अनुभवल कि माझ्यासारख्या छोट्या वाचकाला देखील दाही दिशांत मुक्त भिरभिरून आलेल्या पक्षासारख शांत छान वाटत . उभारी येते आपणही काहीतरी वाचावे अगदी मिळेल ते . 

 खरच वाचका किती खडतर तसा तुझा प्रवास ना तसा ! तुझ्यासारख प्रेम , तो आपलेपणा कदाचितच कुणी पुस्तकांना देऊ शकेल . किती वाचलस ! जाणलस ! जगवलस ! तुझ्या अनुभव गाठोड्यात बंद करून लेखकाला फक्त दादा देत , कौतुक करत, चुकल असता पुन्हा छान लिहिण्याची प्रेरणा देत , पण कधी कधीतुला कुणी विसरलच तर तक्रार न करता शांतपणे बघितलस .

  अरे ! साध वर्तमानपत्र वाचण असो कि वेद, उपनिषद आणि बरच काही ते वाचणच झाल ना ! आजकाल वाचका लोक वाचनाला विसरत आहेत रे !कारण त्यांना वेळ नसतो म्हणे काम असतात .. यामुळे काही लेखकही घाबरतात रे लिहायला पण लेखन आणि वाचन कस ह्रदयाच्या धडधडीप्रमाण जपायचय असत तर निर्झर सरितेसारख वाहत रहायच असत अगदी सातत्याने . तुझ माहेरघर असणार वाचनालय पण आजकाल सुन सुनच असत तुझ्याविना रे! 

  असो अस म्हणतात कि, लेखक हा आयुष्यभर एक वाचक असतो मग लेखक आणि वाचक असे दोन अंग साहित्यात फार फार महत्त्वाचे जसा शरीराला प्राणवायू अस म्हणणंच वैश्वीक सत्य ठरेल ..

आता रे सुचत नाही काही आवरत घेतेय हे पत्र . 

असाच वाचका सगळ्या पिढीला वाचनाचा वारसा देत लेखकांना सांभाळत रहा . श्रीरामांची कृपा सतत तुझ्यासारख्या अनेक वाचकांवर राहो हि शुभेच्छा ..


                                           तुझीच , 

                                              'क्ष' लेखणी 


- प्राजक्ता रविंद्र मनवेलीकर


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट