पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 44- तेजस्विनी शिंदे

 स्पर्धेसाठी,

स्पर्धक क्रमांक- 44


नाव- तेजस्विनी शिंदे

  गाव- सरनोबतवाडी, कोल्हापूर

    मेल: tejaswinis9999@gmail.com



प्रिय,

महाराष्ट्र कवी मंच. 


         पत्र लिहिण्यास कारण की,अनेक गोष्टी मी बोलू शकत नाही त्या मी पत्रातुन लिहिण्याचा प्रयत्न करते.

         मला कविता लिहायची आणि ती स्पर्धेला सादर करायची खूप आवड आहे.मी जेव्हा कॉलेज ला जात होते तेंव्हा अनेक स्पर्धेमध्ये सहभागी होत होते.अनेक गावी स्पर्धेसाठी जात होते.पण अचानक एक संकट आल्यावर 22 मार्च 2020 ला जनता कर्फ्यु ची घोषणा केली.त्यामुळे अनेक कार्य थांबवली गेली.तसेच शैक्षणिक कार्य ही थांबवले गेले आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलागुण सादर करण्याचे व्यासपीठ हरवले गेले.

     पण काही दिवसांनी असच एक हक्काचं व्यासपीठ तयार झालं आणि ते म्हणजे "महाराष्ट्र कवी मंच ". तू मला खूप काही शिकवलं . वेगवेगळे अनुभव घेतले .ज्या गोष्टी स्पर्धा करूनही माहित झाल्या नाहीत त्या गोष्टी तू मला शिकवल्या. तुझ्या सोबत राहून अनेक कवितेचे प्रकार तसेच त्यांचे नियम शिकायला मिळाले. तू माझा शिक्षक ही बनला आणि माझा मित्र ही बनला आहेस .

              तसेच तू अनेक नाती मला वेगवेगळ्या ठिकाणी बनवून दिल्या आहेस . कुठे बहिणीचं नातं कुठे भावाचं तर कुठे मैत्रीचं नातं घट्ट करून दिलं आहेस.तसेच तू मलाच नाही तर अनेक जणांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहेस .तुझ्यामुळे माझ्यातला कवितेबद्दलचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे.मी तुझी खुप खुप ऋणी आहे .तुझ्याबद्दल बोलेल तेवढं कमीच आहे आणि एक गोष्ट म्हणजे तू जेवढी नाती बनवली आहेस ती सगळी नाती तुझ्यावर खूप प्रेम करतात आणि तुझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी रोज तुझ्या नियमांच पालन करून आपले लिखाण सादर करत असतात.

            तू असाच नेहमी खुश रहा आणि आम्हाला ही त्याचा आनंद घेऊन खुश ठेव. 

      एवढीच अपेक्षा ईश्वराला!🙏🏻


तुझीच मैत्रीण,

तेजस्विनी शिंदे.


                

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट