पत्र लेखन स्पर्धक क्रमांक 28- रोहिणी पराडकर
स्पर्धक क्रमांक -28
Name :--- Mrs. Rohini Amol Paradkar
City :---- Kolhapur
Insta id
Gmail ID :---- rpsamarth640@gmail.com
विषय :--- पत्र लेखन
🌹-------------------------------------------------------------------🌹
|| श्री ||
सौ. रोहिणी अमोल पराडकर
कोल्हापूर ४१६००३
९ / ११ / २०२०
प्रिय चि. प्रिंस यांस,
अनेक आशिर्वाद वि वि.
पत्रास कारण की, मला तुझ्या शी बोलायचे आहे. माझे पत्र पाहून दचकलास ना? काय मम्मी विज्ञानाच्या प्रगत देशात हे काय तुझ मागासवर्गीयां सारख पत्र लेखन वेळ व श्रम वाया गेले ना? मोबाईल हातात होता पटकन call / video call करायचा ना? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत तुझ्या मनात कळलं ते मला. पण हे बघ माझ्या लाडक्या बाळा पूर्वी च्या 15 पैश्याच्या पोस्ट कार्ड मध्ये ज्या भावना शब्दात गुंतलेल्या होत्या त्याची सर कशालाच नाही. हे पत्र तू मरेपर्यंत जीवापाड जपून ठेवू शकतो.आयुष्याच्या वळणावर कधी माझी आठवण होईल तेव्हा ह्या पत्रातून मी कायम तुझ्या सोबत असेन. असो!
तुझ्या ध्येयापर्यंत पोहोचताना अनेक अडथळे तुझ्या आयुष्यात निर्माण होतील. तुझ्या जवळपास ची लोक तुला काही धीर देतील तर काही तुझा पाय ओढण्याचा प्रयत्न करतील पण तू खचून न जाता 2 ह्या अंकाप्रमाणे स्थितप्रज्ञ रहाव हे सांगणे आहे. उंच शिखरावर जाऊन भारत देशाचा मान राख, तिरंगा जगात फडकू दे, दाही दिशांना दूरवर तुझी किर्ती पसरु दे हाच माझा आशिर्वाद व हीच ईश्वर चरणी प्रार्थना !
लवकरच तू ख्यातनाम जागतिक किर्तीचा नोबल पारितोषिक विजेता ठरणार ह्याची मला पूर्णपणे खात्री आहे. अनेकांना तू निःस्वार्थी पणे मदत केली त्यांचे अनेक आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत
तेव्हा तू न डगमगता ध्येयाकडे लक्ष ठेव व पुढे चालत रहा. तसेच श्री स्वामी समर्थां चे शब्द आठव *भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे*
चल मी तुझा फार मौल्यवान वेळ घेत नाही व पत्र लेखन संपवून रजा घेते.
तुला माझ्या कडून व तुझ्या बाबां कडून अनेक आशिर्वाद व आपुलकी चे प्रेम आहे. तुला आमच्या दोघांकडून गोड गोड पापा
बेटा काळजी घे.
तुझीच लाडकी आई,
सौ. रोहिणी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा