महाराष्ट्र कवी मंच उपक्रम विजेते क्रमांक 23- अमोल भालेराव, सोलापूर

 *महाराष्ट्र कवी मंच*

उपक्रम विजेते क्रमांक 23-

 अमोल भालेराव, मोहोळ,सोलापूर

♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️


*उपक्रम क्रमांक २३* 


*अनुभवलेखन*



*महाराष्ट्र कवी मंचाने काय दिले*? 


मना पलीकडंच एखादं व्यासपीठ असत,

नियमांच त्यावर कसलही बंधन नसत,

ज्या व्यासपीठावर भावनांना आधार असतो,

तिथं दु:खाला मात्र कसलाही थारा नसतो,

हो मी म्हणेन की अस व्यासपीठ फक्त

आणि फक्त महाराष्ट्र कवी मंचच असु शकतो..


महाराष्ट्र कवी मंच असं बोललं की जस ओठांचा ओठांना स्पर्श झाल्याशिवाय राहत नाही 

तसच  

महाराष्ट्र कवी मंच हे शब्द फक्त ऐकले तरी मनालाही एक वेगळाच हर्ष झाल्याशिवाय राहत नाही


२०२० या वर्षाची वाटचाल कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे थोडीशी वेगळ्या मार्गाने झाली.भयानक अश्या कोरोनाच्या महामारीमुळं सर्वत्र टाळेबंदी घोषित झाली. सर्वांना घरामध्ये बसुन रोजचा दिवस घालवावा लागत होता. व्यवसाय,उद्योगधंदे अश्या अनेक गोष्टी अनेक कार्य मोठ्या गतीनं बंद पडली पण तेवढ्याच जोमानं महाराष्ट्र कवी मंचान कवीमित्रांची नाती घट्ट जोडली.

आणि याच टाळेबंदीच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या अनेक कवी-कवयीत्रींना या महाराष्ट्र कवी मंचाची अनमोल साथ भेटली. आणि जणू एक हक्काचे व्यासपीठच उपलब्ध झाले.

अनेक कवी-कवयीत्रींना ज्या गोष्टी कुठेही शोधून सापडत नव्हत्या ना कुठेही सर्च होत नव्हत्या. त्याच गोष्टी उपक्रमाच्या माध्यमातून अगदी उदाहरणासहीत भेटू लागल्या, कित्येक अनोळखी कधीही न लिहलेले न पाहिलेले काव्यप्रकार सर्वजण जोमानं लिहू लागले. अनेकांच्या थांबलेल्या लेखणीला चालना मिळाली, सर्वांच्या लिखाणाला दाद मिळू लागली, एकमेकांना प्रोत्साहन भेटू लागले, अनेक कवी मित्रांचा आत्मविश्वास वाढू लागला, लिखाणाची आवड सर्वांच्या मनामनात अजून जास्त निर्माण होऊ लागली. आणि या वाढत्या आवडीमुळे अनेकांना टाळेबंदी संपली तरीही

लिखाणासाठी सवड भेटू लागली.मनाची एक वेगळीच रमणुक व्हायला लागली.  या एका व्हॉट्सप समूहाच रुपांतर एखाद्या परिवाराप्रमाणं झालं लिखानातील मार्गदर्शनासाठी सर्वजण एकमेकांना समजवण्यासाठी तत्पर होऊ लागले,लिखानामधील स्वतःच्या चुका सुधारू लागल्या,एकमेकांच्या भावनांना इथं आधार भेटू लागला,अगदी घरातील परिवाराप्रमाणे एकमेकांच्या काळजीचं बोलणं सुरू झालं,वरिष्ठांना आदर भेटू लागला, सर्वांनाच रोज काहीतरी नवनवीन शिकायला भेटू लागलं याची मनाला जाणीव होऊ लागली. आपल्या महाराष्ट्र कवी मंचाला लाभलेल्या अनेक आदरणीय व्यक्ती सर असतील मॅडम असतील यांच्या वतीने होणारं सक्रिय सदस्यांच कौतुक ही एक आम्हा सर्व सक्रिय सदस्यांसाठीची एक वेगळीच उर्जा होती आणि आहे.

या महाराष्ट्र कवी मंच परिवारातील स्पर्धा, उपक्रम हे थोडे निराळेच ते फक्त घ्यायचं म्हणून नाही तर खास करून कवीमित्रांच्या लिखानाला कुठेतरी दाद भेटावी यासाठी हे उपक्रम ,स्पर्धा घेतल्या जायच्या आणि घेतल्या जातात. आणि याच स्पर्धेतील अनेकांच्या लिखानाला दाद देत ते लिखान ई-बुकच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचवण्याचं काम अगदी कमी कालावधीत या महाराष्ट्र कवी मंच्याने करून दाखवलं आहे. खर तर या महाराष्ट्र कवी मंचाच कौतुक करण्यासाठी कितीही लिहलं तरी शब्द अपुरेच पडतील.


  या महाराष्ट्र कवी मंच परिवारातील सर्व सक्रिय सदस्यांबद्दल बोलायचं झालं तर ते जेवढ बोलावं तेवढ कमीच पडेल. प्रत्येकाच नावं घेऊन बोलणं तर शक्यच नाही अवघ्या चार दोन ओळींमध्ये व्यक्त करण्यासारखी ही व्यक्तिमत्व नाहीतच त्यांना सर्वाना म्हणेन की

या महाराष्ट्र कवी मंच्यामुळे ओळख आपुली झाली,

एकमेकांच्या गोड स्वभावामुळे आपली ही नाती जुळुन आली, 

भेटलो नाही कधी ना कधी एकमेकांस आपण पाहिले आहे, 

तरीही या कवी मंचामुळं मैत्रीच्या सुंदर नात्याने मन आपुले जुळले आहे.

आणि तुमच्यासारखे मित्र मैत्रिणी मला भेटले यातचं मला माझ भाग्य मिळाले आहे.

खरंच ते म्हणतात ना चांगली माणसं भेटायला नशीब लागत हे या मधून स्पष्ट झाले आहे.


आणि शेवटच्या या चार ओळी माझ्या सर्व महाराष्ट्र कवी मंच परिवारातील सदस्यांना समर्पित


घेऊन आधार महाराष्ट्र कवी मंचाचा जपुया कवींच्या लेखणीचा वारसा

लावाया गोडी अनेकांना लेखणाची करुया ना प्रयत्न आपणही थोडासा

थोडीशी साथ कवीमित्रांना देऊन त्यांची थोडीशी साथ आपणही घेऊ

आपणही स्व:ताच्या चुका सुधारावत दुसऱ्यांनाही त्यांच्या चुका समजावु

असुया नेहमीच तत्पर आपण महाराष्ट्र कवी मंचाच्या कार्यासाठी

हरलो तरी लढत राहु पुन्हा जिद्दीन आपल्या महाराष्ट्राच्या शौर्यासाठी

एकात्मतेनं जाऊया पुढं सर्वजण कधीच न करता भेद कशाचा

एक दिवस नक्कीच वाजेल डंका या महाराष्ट्र कवी मंचाच्या ऊज्वल यशाचा..😇✌🏻

      

                  *✍🏻..अमोल ईश्वर भालेराव (सोलापूर)*

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट