पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 45- दिक्षा चौधरी
स्पर्धक क्रमांक 45
स्पर्धकाचे नाव - चौधरी दिक्षा रामलिंग
insta ID- diksha_chaudhari_7
गावचं नाव - पांगरी (सोलापूर)
Email ID- dikshac437@gmail.com
पत्रलेखन विषय - भारत माता
नमस्कार भारतमाता ,
भारत माता तुझी शान ही अशीच राहिली आहे आणि इथून पुढे ही राहणार , याची मलाच नाही तर पूर्ण भारत वासियांना खात्री आहे .आणि हे तुला ही माहित आहे की तुझी ही शूर वीर लेकरं तुला आबादित ठेवण्यासाठी आपल्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाहीत.आणि तुझा आशिर्वाद हा त्यांच्या पाठीशी असाच कायम असुदे.
भारतमाता तु अवघ्या हिंदुस्थान ची माता आहेस. तुझं हे मायेच छत्र या पवित्र भारत भूमीवर असणार ह्यात काही शंकाच नाही , पण तुझ्या रक्षणासाठी तिथं बॉर्डर वर रात्रनदिवस डोळ्यात तेल घालून शत्रूशी दोन हात करणाऱ्या तुझ्या त्या शूर लेकरांच काय ग ?
तुझं रक्षण करताना कधी कधी तुला तुझा पुत्र गमवावा लागतो तेव्हा तुझ्या वर किती दुःख होत असेल हे तुझ्याशिवाय बाकी कोणीच नाही समजू शकणार . खरंच सलाम तुझ्या त्या शौर्याला आणि त्या त्यागाला . तु जर संकटात असली तर तुला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी तुझा प्रत्येक वीर पुत्र हा जीवावर खेळतो . आम्ही सगळी तुझी लेकरं तुझ्यावर खूप प्रेम करतो.
भारत माता एक सांगू का ग ? तुला जसं तुझ्या लेकरांची गरज आहे तशी च गरज त्या आईला आहे , जिने तिच्या काळजावर दगड ठेवून तुझ्या रक्षणासाठी आपला मुलगा / मुलगी दिली. तिच्या पण मातृत्वाला खरंच सलाम.
भारतमाता तुझ्या वीर पुत्रांना बघायला , भेटायला गावागावातली झाडे , डोंगर , नदी नाले , शेत आसुसलेत . प्रत्येकाला आठवण येतेय. पण तुझीच शिकवण आहे ना की फौजी ला सगळ्यात आधी देश महत्वाचा .
तु जेव्हा १५० वर्ष इंग्रजांच्या साखळदंडानी कैद होतीस तेव्हा तुझ्या डोळयातलि आसवं आम्हाला हैरान करायची . तेव्हा महात्मा गांधी , सुभाष चंद्र भोस, भगतसिंग , राजगुरु , सुखदेव यांच्या सारख्या अनेक क्रांतीकारांनी आपल्या जीवाची आहुती दिली . ते म्हणतात ना ''कोशिश करनेवालों की कभी हार नही होती !" त्यांच्या प्रयत्नांना तुझ्या आशिर्वादची साथ होती म्हणून तुला ते त्या पारतंत्र्यातून मुक्त करू शकले. अनेक हुतात्म्याच्या बलिदानाला यश मिळालं.
भारतमाता तु कशी दिसतेस ? हे मी कधी बघीतलच नाही . पण जेव्हा जेव्हा मी माझ्या आईच्या डोळ्यात माझ्याविषयीची काळजी बघते, तेव्हा तेव्हा मला तुझा भास होतो. माझी आई तर फक्त माझ्या परीवाराची काळजी घेत पण, तु अवघ्या भारताची काळजी घेतेस . आमच्या सगळ्यांवर माया करतेस . खरंच आई ही आईच असते . तिची जागा इतर कोणीही घेऊ शकत नाही.
१० रुपयाच्या कफनात कोण बी गुंडाळून जातंय पण तिरंग्यात लिपटून जायची शानच वेगळी असती...!!
एक भारत वासी
_ दिक्षा चौधरी
पांगरीकर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा