पत्रलेखन स्पर्धक क्रमांक : 31 - सौ राजश्री विठ्ठल सुतार

स्पर्धक क्रमांक : ३१


राजश्री विठ्ठल सुतार

तालुका इंदापूर जिल्हा पुणे

sutarrashri188@Gmail.com



 सौ रा.वी.सुतार.

.... तालुका इंदापूर

               जिल्हा.पुणे


स्पर्धेसाठी


पत्र


प्रिय जिवलगा!

      कित्तेक वर्षांचं काळजात रुतून बसलेले दुःख ओठांवर कसं आले तेच कळलं नाही. डोळ्यांचे बांध फुटून पापण्या ओल्या झाल्या हे जाणवलेच नाही. कारण खूप वर्षांची ही वेदना आजही तितकीच तीव्र होती. अपराधी पणाची.मन चैन पडू देत नव्हते.मनी एकच ओढ होती ती माफी मागण्याची. अगदी मनापासून.

         मन खळाळून व्यक्त होत होतं. थोडक्यात गुन्हा कबूल करावासा वाटला. कधीकधी गुन्हा कबूल करून मन मोकळं होतं.

        तुला मी समजू शकले नाही.तुझे प्रेम मी समजू शकले नाही.हे माझे दुर्भाग्य. कारण मी त्या वेळी मी खरेच अल्लड होते रे.नंतर नंतर मला तुझ्या प्रेमाची जाणीव होत होती .परंतु पूर्ण समज नव्हता.मला पून्हा पुन्हा तू आवडू लागला स ,ते खूप .तुझे माझ्यावर खूप प्रेम होते.तू माझ्यासाठी खूप काही केले.देवाचे उपवास देखील केले. पांढरी रुईची दोन फुले मला द्याचा.का तर आपले प्रेम टिकावे म्हणून. तू म्हणायचा की त्या फुलात खूप ताक त असते. मीही विश्वास ठेवायचे.माझ्यासाठी तू खूप काही केलेस. अतोनात प्रेम केलेस. मला खूप बंधने होती.मला नियमांच कुंपण होते. त्यामुळे मला वाटून ही काही करू शकत नव्हते.लिहिताना मला आज आठवतंय की तू जेव्हा माझ्याकडे प्रेमानं पहायचास तेव्हा तुझी माझ्याकडे रोक असलेली ती रकी नजर व उजवी कडचा तुझा ओठ तू दाताने जरा दाबून धरायचास.पण ते तुला छानच दिसायचं बरका.तेव्हा तुला सांग न झाले नाही ठरवूनही.खूप सांगावस वाटायचं.परंतु धडा व्हायचा नाही .छातीत धडधडत होते.खूप काही बोलावंसं वाटायचं.राहूनच गेलं.वडी लांची खूप भीती वाटायची..मन मात्र दाटून यायचे.जेव्हा तू माझा हातात हात घ्ययचा,तेव्हा तुझा स्पर्श मला खूप काही मनाला आधार देवून जायचा.

     एकदा तर मी आजारी होते.मला सलायेन लावलेले.तू मात्र माझा हात तुझ्या हातात घेऊन बसला होतास.का तर शिर आऊ ट जाऊ नये म्हणून रात्रभर तू झोपला सुद्धा नव्हता.आमच्या घरची म्हणायचे की किती मित्र चांगला आहे.

      तू मला बोलून ही दाखवले होते. की माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे .तू तशी चिठ्ठी ही दिली होतीस.माझ्या मैत्रिणीजवळ.मला उत्तर देऊ वाटतं होते.ती संधी मला नशिबाने दिलीच नाही. त्याचे उत्तर द्याचे राहून गेले.केवळ वडिलांच्या भीतीने. तू प्रत्येक बहाणा करून भेटायला येत.नंतर नंतर मी ही तुझ्या प्रेमात पडले.आपण दोघेही एकमेकांजवळ मन व्यक्त करू लागलो. एकमेकांच्या सुख दुःखात साथ देऊ लागलो.मला भीती वाटायची की तू माझ्यापासून दूर जातोय की काय?म्हणून मी खूप देवाची प्रार्थना करायचे. परंतु तू खूप दूर गेलास.

       आणि तसंच झालं. आपल्या प्रेमाला घरच्यांची मान्यता नव्हती.केवळ तुझी परिस्थिती गरीब होती म्हणून.परंतु मी ही गरीबच घरातील होते पण ते घरच्यांना का जाणवत नव्हते .गरिबिन आपल्या दोघांना दूर केले. दोघांचा सूड घेतला.तरीही तू मला लग्नाची मागणी घातली.त्या वेळी तू मागे हटला नाहीस. परंतु मी तुला साथ दिली नाही. तेव्हाच तुझी माझी वाट झाली वेगळी.वाट वेगळी झाली होती.परंतु मने मात्र एकमेकात गुंत ली गेली होती.

        मी मुलगी असल्यामुळे घरात बोलू शकत नव्हते. मी तुझ्यावर अन्याय केला.

       नंतर माझे लग्न झाले.मी संसारात रमले.पण तुझा विचार डोक्यात यायचा बरका.की याने लग्न केले की नाही.त्यासाठी मी नेहमी तुझ्या शोधात असायचे.

       अठ्ठावीस वर्षानी अनपेक्षित च तुझी भेट झाली.ते तुझ्या कुटुंबास हित.बरे वाटले तुझे कुटुंब पाहून.कारण मला तुझी कसलीच चिंता उरली नव्हती .कारण तुझी फॅमिली तुझ्या बरोबर होती.जेव्हा तुझ्याकडे नजर गेली तेव्हा आजही तू पूर्वीसारखाच तितक्याच प्रेमाने माझ्याकडे पहात होतास.तुझी ति विरहाची नजर आज ही मला सर्वकाही सांगत होती.अन् मी फक्त ऐकत होती. परंतु माझी नजर तुला तळमळीने सांगत होती की आपल्या दोघांच्या वाटा नियतीने वेगवेगळ्या केल्या आहेत.दोघांमधील आंतर तोडणे अशक्य आहे.ते मात्र तुझी नजर ऐकून घेत होती.

         दोघांच्याही नजरा समजून घेत होत्या .की आता तुझी माझी वाट झाली वेगळी.परंतु आज खूप श्रीमंतांच्या यादीत तुझेही नावआहे.हे कलयावर मला आनंद वाटला.

         पत्र वाचून मला माफ करशील ना.?

तुझी व फॅमिली ची काळजी घे. माझे हे पत्र तुला पहिले च आहे.कारण जेव्हा तू माझ्याजवळ होतास, तेव्हा तू डोळ्यांसमोर होतास.पत्र लिहायची वेळच आली नाही. अठ्ठावीस वर्षानी पत्र लिहिण्याचा योग आला. ...............

      इतक्या वर्षांचं काळजात ल दुःख मोकळे झाले. व मी गुन्हा कबुल केल्या मुळे मन हलके झाले.माफ कर.

                 तुझीच 

            मैत्रीण

               



           सौ राजश्री विठ्ठल सुतार.

             तालुका इंदापूर जिल्हा पुणे


मुक्काम कळंब,पोस्ट वालचंदनगर

Laxminagar

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट