महाराष्ट्र कवी मंच उपक्रम क्रमांक:-२६*♦स्मिता माने✍🏻
♦️ *महाराष्ट्र कवी मंच*♦
♦️ *उपक्रम क्रमांक:-२६*♦️
♦️ *काव्यप्रकार:- लहान अभंग*♦️
*विषय:-परिस्थिती*
कधी असते सुखद | कधी वाटते दुखद||
करा जरा चारहात | गाळू नका पायहात ||
कष्टातून या वरती | फुकट नको भरती ||
प्रामाणिक जे करती | तेच येतात वरती ||
परिस्थिती हतबल | यशाच्या दिशेला कल ||
जिद्द ठेव पुढे चल | हरलास तरी चल ||
थांबला तर हराल | काटा लागला रडाल ||
परिस्थितीला हसाल | टाळ्या पिटत बसाल ||
करा कष्ट बना जिद्दी | नको ती स्वप्नाची रद्दी ||
घ्या मेहनत कामाची | मान ताट हो बापाची ||
*# स्मिता माने✍🏻*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा