पत्रलेखन स्पर्धक क्रमांक :३२‌ - अरविंद रघुनाथ सुतार

स्पर्धक क्रमांक :३२

अरविंद रघुनाथ सुतार 

तालुका इंदापूर जिल्हा पुणे

sutarrajashri188@Gmail.com



प्रेमपत्र

     पत्र लिहिण्यास कारण की एक मेवच आहे. मी माझ्या प्रेम पक्षिनीसाठी तुझे घरटे शोधीत दादरला आलो. तू माझे स्वागत केले.तुझे आई वडील व छोटी बहिण बेबीनंदा यांचा प्रथम परिचय झाला. आपुलकीने दोन दिवस तुझ्या घरी राहिलो.सहवासामुळे टॅक्सी घेऊन आपण मुंबईला वेडा दिला.

       गेट वें ऑफ इंडियाचा आपला होडीतला सागर जल प्रवास.खारे शेंगदाणे व चने यांची चव विस्मरणीय आहे.सागरातील ते पाणी तुझ्या कोमल करांनी माझ्या मूख चंद्रावर शिंपडलेस.त्यावर मी अजून रुमाल फिरवतो.तेथे घेतलेले आपले फोटोआपली किती जवळीक ते सांगतात. नंतर दादर चौपाटी ला सागराच्या मऊ रेतीत खेळ खेळलो.आपल्या सारखीच सर्व होती. ओली भेळीची आठवण व चव येते.सागराने आपल्याला जवळून पाहिले. मला सी आ य डी ची देवानंद ची शूटिंग आठवली.

     मीनाक्षी! माझा आपला दिलीप कट गोल्डन व्हाईट ड्रेस बूट अन हो माझी गौर कांती, बहारदार चेहरा, बोलण्याची भाषाशैली, हसरा चेहरा आवडला का?

    मीनाक्षी मी तुमचा निरोप घेऊन आलो. पण तुम्ही सर्वजण माझे घरी चार दिवसात आलात. यातच माझे प्रश्नाचे उत्तर लपले होते. माझ्या घरात माझा लग्नाचा थोर भाऊ होता. माझ्या घरातील माणसांचा स्वभाव मला माहित होता.तरी सुद्धा मी तुझ्या कोमल काये वरून हात फिरवला.माझी स्टडी रूम तीच आपली बैठक खोली झाली. तुला जे माहित नाही ते सांगतो. मी भित्रा नाही. कुणाला दबकत नाही. माझे पुढे सर्व चुपचाप. प्रेम करायचे तर भीती कशाला? आपली हालचाल तुझ्या आई-वडिलांना आनंदी वाटली. पण बहिणीची नजर आपल्यावर करडी वाटली.

     थोरांच्या लग्नाविषयी यांच्या वाटाघाटी चालायचा. तुझ्या प्रेमाला उधाण आले होते. माझे कपडे धुवायची. माझी आई तुला रागवायची. तू तरी इस्त्री सुद्धा करणार म्हणायची.

      खरं सांगू का? मीनाक्षी, तुझा तो मोहक आनंदी चेहरा, क***** केसांचा झुपका, मोगर्‍याचा गजरा, कानातील लोंबणारे चंदेरी डूल, माशाप्रमाणे डोळे हातातील लाल बांगड्या, पायातील पैंजण

त्या डिझाईनच्या साड्या पाहून माझे मन भरून जायचे. आपण दोघे फिरायला जायचो. छत्री हातात घेऊन पर्स बरोबर घेतली की झाले. मज्जाच. कॅनल वरून बिग गार्डनला फिरायला जायचं. सर्वजण आपल्याकडे टक मग बघायचे. त्याच गार्डन ला माझा भाऊ मित्राबरोबर फिरायला जायचा. त्याचा मित्र होता तोच मित्र माझा सुद्धा मित्र होता.

       मनात आले की आपण चित्रपट पाहायला जायचं. फर्स्ट क्लास चे तिकीट काढून. आरामशीर पिक्चर बघत. मुके चाळे करायचो. माझा स्वभावच असा आहे.

       मी अन् माझी खोली. माझ्याशी कुणी बोलत नसायचे कामापुरतेच. त्या खोलीत तुला करमले का ग?

     मीनाक्षी लक्षात ठेव. हाताने घेतलेला स्पर्श नाकाने हुगलेला श्वास, डोळ्यातील चित्र. मी कधी विसरणार नाही. एकच ध्येय मी जिथे तू तिथे.

     दोन महिने गेले तू येऊन. आपली भवितव्याचे स्वप्न रंगली. आन माझ्या पप्पांनी तुझ्या पप्पाला आपल्या लग्नाचा नकार दिला. मी आणि माझे साठी दुसरे लग्न ठरवले. आपल्या दोघांचा विर ह झाला. दोघांची मनाची तडफड झाली.

      बरे असो सुदैवाने बुद्धी दिली. मी तुला म्हणलो मीनाक्षी मी जिथे तू तिथे. असल्याशिवाय मला जगणे शक्य नाही. तर माझ्या मित्राबरोबर तुझा विवाह कर. नंतर मीही माझा विवाह केला. 

      नंतर तू मीनाक्षी माझ्या पत्नीची सख्खी बहीण च झाली. मीनाक्षी तू 

माझ्या नजरेसमोरच कायम राहिली. माझ्या मित्रा समवेत. तुझा सुखी संसार मी पाहिला. यातच माझे प्रेम होते.

                 तुझाच स्नेही

                  भाऊजी

        

अरविंद रघुनाथ सुतार.

मुक्काम कळंब , पोस्ट वालचंदनगर 

तालुका इंदापूर

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट