महाराष्ट्र कवी मंच उपक्रम विजेते क्रमांक -20 माधुरी जाधव, सातारा

  विजेता उपक्रम क्रमांक 20 

नाव -माधुरी जाधव, सातारा


♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️


*महाराष्ट्र कवी मंच*


♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 


      *उपक्रम क्रमांक 20*


    *काव्यप्रकार -चित्रकाव्य*


♦️♦️♦️♦️♦️♦️♦️♦️ 


          *लाखांचा पोशिंदा* 


लाखांचा पोशिंदा तो

कसतो काळी माय

तमा नसे ऊन-पावसाची 

रक्तबंबाळ त्याचे पाय 


शेतातल्या कामात साऱ्या 

कारभारणीची मोलाची साथ

 तिच्या खंबीर पाठिंब्यामुळे

 साऱ्याच प्रश्नांवर केली मात


 पेरणी,कोळपणी,भांगलणी, छाटणी

 शेवटी शेत जोमदार येते कापणीला

 निसर्गही क्रूर खेळी करतो अवचित

 काहीच पिक येत नाही वाटणीला


 निसर्गाने त्याला दिलीच साथ तर

हमखास घसरण होते बाजारभावात

 रोजगारी आणि दलाल होतात श्रीमंत

 शेतकऱ्यांचे भांडवलही जाते पाण्यात


 दिवसामागे दिवस सरतात

 हलाखीत आयुष्य जाते निघून

 समाधानी राहतो फाटक्या संसारात

 जगाचा अन्नदाता होतो अश्रू लपवून


 न्याय मिळत नाही शासनदरबारी

राब-राब राबूनही तो कर्जबाजारी

 खाईलच काय जनता अवघी

 जर राहिलाच नाही शेतकरी???


       ✒️ सौ. माधुरी जाधव 

                  सातारा

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट