पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 33 हिरालाल तांबोळी
स्पर्धक क्रमांक -33
Name_ Hiralal Babalal Tamboli.
City-Kavthe mahankal,sangli.
E-mail--hbtamboli 5151@gmail.com
महाराष्ट्र कवी मंच,आयोजित
राज्यस्तरीय ब्लॉग स्पर्धा
अंतर्गत स्पर्धा.
विषय--पत्रलेखन
स्वतःस पत्र.
प्रति,
माझ्या मनास,
मु.पो.ह्रदय,
काळजाचे शेजारी.
अरे,माझ्या मना....,
तुला किती वेळा समजावलं,
जीवन जगण्याच्या लढाईत सुखाची अपेक्षा ठेवू नको.
सुखाच्या मागे तर सगळेच धावतात,पण ते कुणाला सापडल्याचे ऐकलंस कधी ! सारे आयुष्यभर धडपडत ठेचकाळत,रक्तबंबाळ होत सुखाचा पाठलाग करतातच.
शेवटी हात रिकामेच ना !
तू मात्र इतकंच कर,आपल्या
जीवन संघर्षांत येणारे बरे वाईट अनुभव शब्दांना सांगून साऱ्या व्यथा,वेदना मनाच्या भावना कवितेतून व्यक्त कर.मना तूच माझा सुख दुखातला खरा साथीदार आहेस.निदान त्या इतरांना कळल्यावर थोडं समाधान मिळेल.(सुख नव्हे)दुःख हलकं होईल.
जीवनाच्या अंतापर्यंत संघर्ष तर आपल्या नशिबी आहेच की.आसवं गाळून,एकांतात बसून,पोटात दुःख लपवून ओठांवर उसनं हसू आणून भावना व्यक्त कर.त्यासाठी शब्द आपली मदत करतील.
नेहमीच वेळी अवेळी कधीही.स्वप्न डोळ्यात साठवून लेखणीला वंदन कर,कागदावर आपोआपच भावना,वेदना,दुःख,प्रेम,सारंकांही व्यक्त होऊन उमटत राहील.तेच खरे साथ देतील
अखेरपर्यंत,विनातक्रार, अखंडपणे.थोडं सुख
(क्षणभर चं)आलं तरी हुरळून जाऊ नकोस.कारण आयुष्यभर जगण्याशी आपणचं,एकटेच लढणार आहोत.बाकी सारी नाती आप्तेष्ट,मित्र स्मशानापर्यत सोबत देतात.स्वार्थापासून थोडं लांबच रहा.निस्वार्थी माणसाला मोक्ष मिळतो म्हणे,ना जाणो आपणाला मिळाला तर?जाऊ दे,निराश होऊ नको,हसत रहा,
लढत रहा,जगत रहा,साऱ्या वेदना,समस्याशी अखेरपर्यंत झगडत रहा.आहे त्यात
समाधानी रहा.धेय्य गाठण्यासाठी प्रयत्नशील रहा.शब्दातून,कवितेतून अखंड मुक्तपणे बरसत रहा.भेटू पुन्हा स्वप्नात एकांती......
तुझाच मी....
एच.बी.तांबोळी.
क.महांकाळ,सांगली
संपर्क--८७६६५१८१२६.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा