महाराष्ट्र कवी मंच उपक्रम क्रमांक २५अनुराधा रत्नाकर उपासे मंगरूळ ता तुळजापूर
घर
महाराष्ट्र कवी मंच आयोजित
उपक्रम क्रमांक २५
काव्य बत्तीशी
घर
घर असावे भरलेले
गोकुळासम जसे
रहा समजून सर्वांनी
जिव्हाळा माया तसे
घर सजवावे प्रेमाने
झाडे वेली अंगणी
गंध दरवळे फुलांचा
लेकीच्या पैंजणानी
सासू सासरे मायाळू
आई वडिल जसे
भाऊ बहिणीची माया
दिर नणंद तसे
धनी प्रेमळ स्वाभिमानी
आदरयुक्त भिती
थोरा मोठ्यांची सर्वांनाच
त्यात आनंद किती
एकमेकांच्या भावनांचा
व्हावा सदा विचार
संकट समयी सदैव
घराचाच आधार
सुख समाधान, विसावा
घरातच मिळते
संस्कार संस्कृतीचा ठेवा
घरच तर देते
घर म्हणजे फक्त नाही
चार भिंती आसरा
माया जिव्हाळा आपुलकी
तो दिवाळी दसरा
सौ अनुराधा रत्नाकर उपासे
मंगरूळ ता तुळजापूर
जि उस्मानाबाद.
Khup sundar ❤️🙏
उत्तर द्याहटवा