पत्रलेखन स्पर्धक क्रमांक : 40 - धनश्री साखरलाल महाजन
स्पर्धक क्रमांक : ४०
नाव: धनश्री साखरलाल महाजन
Insta Id: dhanashre3 (dhanashree mahajan)
City: एरंडोल, (dist: जळगांव)
EMAI-ID: mahajandhanashree24@gmail.com
..प्रिय दादा..
कसा आहेस,आई बाबा कसे आहेत.
मी अगदी ठीक आहे माझी काळजी करू नका. तस तर रोज बोलणं होत असत रे, पण आज जरा घराची जास्त आठवण येत होती. मन अशांत होत म्हंटल आज पत्र लिहूया.मनातलं सगळं बोलायचं होत. कॉल वर बोलत नाही कारण तेव्हा अश्रू अनावर होतात मग आई बाबा काळजी करतात. म्हणून आज या पत्रात बोलतोय.घरी येऊन ही आता बरेच दिवस झाले.पण तुला तर माहीतच आहे सैनिकाला लवकर सुट्टी कुठं भेटते..!
इथं सगळं म्हणायला ठीक आहे रे, कारण "जेवण आहे पण आईच्या हातची चव हरवलीये.
पोळी खाताना ताई आठवते रे की तिच्या छोट्या छोट्या हाताची पोळी ही खूप मऊ असायची मग तिचा आकार अगदी नकाशा असला तरी ती खाऊन पोट च नाही तर मन ही भरायचं,आणि आज इथे कितीही गोल असली तरी तस मन काय पोट ही नाही भरत.आई बाबा शेतात असताना ही मी तिच्याशी किती भांडलो तरी ती शिव्या देत देत का होईना पण जेवनाशिवाय बाहेर पाऊल ही ठेऊ द्यायची नाही. आज तिच आणि तिच्या त्या कडवट शिव्या न मागच प्रेम फार चं आठवतेय😢😍
आई म्हणते ते खरं आहे रे की आपली तायडी बाबा ची चिमुकली नकळत च फार काळजी करते ती आता मोठी झाली शहाण्यासारखी वागते..
सकाळी पाणी टाकताना आई चा तर कपडे घेताना ताई चा जसा काही भास च होतो क्षणोक्षणी.
इथं झोपायला गादी असते पण गावाकडच्या मातीची ऊब नसते,झोपताना तो गच्चीवरचा थंडगार वारा मनाला सतत आठवण देतो"इथे नवीन मित्र खूप आहेत पण शेवटी त्यांनी नकळत का होईना तुझं माझं म्हटलं की पुन्हा एकटा पडतो आणि डोळे भरून येतात पण ते ही इथे लपवावं लागत. सगळे सोबत राहतो पण आपला लहानपणीचा याराना खूप आठवतो. सगळे सोबत मस्ती करायचो,एकत्र जेवायचो ,एकत्र राहायचो ,लहान असताना ही साधं खरचटलं तरी आपली गल्ली जमा व्हायची, ती काळजी च काही वेगळी आणि आज ती फार काळजाला क्षणोक्षणी हसून रडवते रे..
गावाकडचे खेळ ,ते गावाकडचे सण इतके छान असायचे की माहिण्याआधी च ओढ लागायची आणि आज इथे सण येऊन जातो तरी जाणवत सुद्धा नाही कारण इथे सर्वांची मन जवळ असूनही परकी आहेत इथल्या प्रत्येक वस्तू वर अधिकाराचे नाव आपले नाही तर तुझं माझं असत..
आणि आपल्या गावी तुझं माझं कधीच नव्हतं,कधी जाणवले च नाही..
कदाचित म्हणून चं ते सगळं दूर असूनही इतकं प्रिय आहे..पण तेव्हा वाटायचं मी कधी एकदा ARMY जॉईन करतो.पण जितक गाव प्रिय आहे ,तितकी मला माझी आर्मी ,माझी वर्दी ही प्रिय आहे..!🇮🇳आणि आज त्याचबरोबर माझं स्वप्न पूर्ण झालेलं बघताना खूप proud feel होत .
असो..
तुझी नोकरी कशी चालूये, पगारवाढ झाला की नाही.जास्त ओव्हरटाईम नको करत जाऊ. तुला ओळखतो मी तू बोलत नाही मनात ठेवतो, पण तरी पैसे लागले तर मला सांग.
अरे हो,..!बघ तुला सांगायचं राहीलच..
माझं प्रमोशन होणार आहे.तुला सांगताना खूप आनंद होतोय.. मागच्याच महिन्यात एका मिशन साठी निवडले होते त्यात चांगली कामगिरी बघून हे प्रमोशन देण्यात येतंय.आता मी एक कमांडो
म्हणून काम करेल,पुढच्या महिन्यात 15 ते 20 दिवसांच्या कॅम्प मध्ये पाठवण्यात येईल.तेव्हा आपला संपर्क बंद राहील. आणि कदाचित या दिवाळीत घरी यायला मला जमणार नाही.. कॅम्प नंतर 8 9 दिवसात सुट्टी भेटेल..
प्रमोशन झाले तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासाच होता.वाटत होते की मी आज खऱ्या अर्थाने एक फौजी झालोय ,माझ्या देशासाठी जगलोय. Finally माझं स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले.
खूप छान वाटत होते त्यावेळी,पण डोळ्यात अश्रू होते.. की हा आनंद मी तुमच्या सोबत नाही वाटू शकलो.
खूप आठवण येतेय तुमची इथे..अस झालंय मी कधी सुट्टीवरती येणार.. आणि मला खात्री आहे की आपण लवकरचं भेटू..!
असो..
खरं तर इतकं बोललो पत्रात पण तरीही अपुर्ण वाटतय.. हो पण मन अगदी शांत वाटतय तुला सांगून. लिहायला गेलं तर वहीं अपुर्ण पडेल इतक्या गप्पा राहिल्यात अजून.. असो तरी आज इतकंच लिहितो..माझं पत्र मिळाले की नक्की कळव मला..
आई-बाबांची ताई ची काळजी घे,स्वतःलाही जप. आणि माझी चिंता करू नका मी अगदी व्यवस्थित आहे..!❤️
तुमचा प्रिय..
फौजी
Please Read And Comments..
उत्तर द्याहटवाThank you Maharashtra kavi manch for this Opportunity for writers And poets.. thank you so much..
Please comments nd read
खूप सुंदर लिहिले आहे✍️👌
हटवाखूप सुंदर लिहिले आहे✍️👌
हटवाNice dhanu👌👌
हटवाखूप छान लिहिलं आहे...
हटवाएका फौजीच मत आणि त्यांच्या भावना अप्रतिम मांडल्या आहेस di..
Khup Chhan 😊
उत्तर द्याहटवाMasssst dear keep it up 👍
उत्तर द्याहटवाKhup sundar...👌👌👌👌
उत्तर द्याहटवाKhup khup apratim
उत्तर द्याहटवाKhup sundar👌👌👌👌👌
उत्तर द्याहटवा👌👌
उत्तर द्याहटवाNice 🔥👌👌👌👌
उत्तर द्याहटवाKhup mast...👌👌👌
उत्तर द्याहटवाNicee👌👌
उत्तर द्याहटवाMST 👌👌
उत्तर द्याहटवाVery Nice 👌
उत्तर द्याहटवाTu khup Chhan lihate . Aasech lihat Raha....😊
उत्तर द्याहटवाTu khup Chhan lihate . Aasech lihat Raha....😊
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख लिहिला आहे 👌✌
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा👌👌👍
उत्तर द्याहटवाKhupch chan 👌✌️🤘👍
उत्तर द्याहटवाखूपच छान लिहिलं आहे दीदी तू 🤗🤗😊😊❤️❤️
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाखूपच छान लिहिलं आहे दीदी
उत्तर द्याहटवाVery very nice
उत्तर द्याहटवाKeep it up di
उत्तर द्याहटवादीदी तुझे विचार तू खूपच सुंदर पद्धतीने मांडले आहेत. अतिशय सुंदर लेख लिहिला आहे वाचून खूपच छान वाटले.
उत्तर द्याहटवाSupb
उत्तर द्याहटवाApratim
उत्तर द्याहटवाNice once
उत्तर द्याहटवा1ch no.
उत्तर द्याहटवाखूप छान लिहिलं आहे...
उत्तर द्याहटवाएका फौजीच मत आणि त्यांच्या भावना अप्रतिम मांडल्या आहेस di..👌👌
Khup sundar lihilay 👌🏻👌🏻
उत्तर द्याहटवाखुप छान 👍👍 एका फौजीच्या मनातील भावना अत्यंत सुंदर पणे मांडली आहे🙏🙏👍
उत्तर द्याहटवाNice,keep it up 👍👍
उत्तर द्याहटवाNice😊👌👌
उत्तर द्याहटवाअतिशय सूंदर लिहिलंय
उत्तर द्याहटवा