पत्रलेखन स्पर्धक क्रमांक : ३४ - वैष्णवी विक्रम भगत.
स्पर्धक क्रमांक : ३४
....महाराष्ट्र कवी मंच स्पर्धेसाठी....
नाव : वैष्णवी विक्रम भगत .
उमरगा, उस्मानाबाद
Insta id : 1105_b_vaishu
Email : Vaishnavib112002@gmail.Com
विषय : शाळेचे विद्यार्थ्यांना पत्र
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
हो मला माहिती आहे तुम्हाला खूप मोठा प्रश्न पडला असेल. अचानक तुमची आठवण काढल्या बद्दल.
मला माहिती आहे तुम्हा सर्वांना माझी खूप खूप आठवण येत आहे , म्हणून तर मी हा निर्णय घेतला. तुमच्या सोबत थोड्या मनमोकळ्या गप्पा मारण्याचा. खूप प्रयत्न केला तुमच्या सोबत गप्पा मारण्याचा पण आज एक चांगले माध्यम सापडले.
खर तर मला तुम्हा मुलांचा रागच यायचा , तुमचा तो गोंधळ शाळा सुटल्यानंतरची तुमची बेशिस्त , खेळाचा तास असला तर विचारुच नका . खाऊ खाऊन केलेला कचरा , वर्गात शिक्षक नसले कि तुमचा गोंधळ . प्रार्थनेच्या वेळचा तो बेशिस्त पणा , ते सगळं मला अजिबात आवडायचं नाही , खूप खूप राग यायचा.
पण मुलांनो आज मनाला एक वेगळीच हुरहूर लागलीय . आज सात महिने उलटून गेली तरी तुम्ही मला दिसला नाही. कोठे आहात तुम्ही सर्व जण? आणि हो कसे आहात ? काळजी घ्या बरका। काल वॉचमन काका तुमचं काय ते मोबाईलचं status पाहात होते . तेव्हा मला समजलं तुम्हाला माझी आठवण येतेय . तर मुलांनो तुम्ही जसे शाळा / महाविद्यालयांना Miss करताय ना तस मी ही तुम्हाला खूप खूप Miss करतेय. मला तुम्हाला लवकरात लवकर भेटायचं आहे. तुमचा गोंधळ, तुमची बेशिस्त खरचं मला पुन्हा अनुभवायचं आहे . आणि खासकरून तुम्हा सर्वांचा आवडता खेळायचा तास , मला तुम्हाला पुन्हा मैदानात पाहायचे आहे.
माझ्या समोरील मैदानात
धडपडताना पाहायचं आहे....
हारल्यानंतरही पुन्हा नव्या उमेदीने
जिंकण्यासाठी उभं राहाताना बघायचं आहे...
तुम्ही उंच भरारी घेताना मला पुन्हा
तुमच्या पंखात बळ भरायचे आहे...
होय , मला तुम्हाला पुन्हा
मैदानात पाहायचे आहे....
तर विद्यार्थी मित्रांनो , येताय ना तुम्ही माझ्या कडे . लवकर या मी तुमची खूप वाट बघतेय.
तुमचीच शाळा.
खूप छान अगदि कमी शब्दात आणि सोप्या भाषेत पत्र लिहिलं आहे खूपच छान एक नं👌👌👌👌
उत्तर द्याहटवाkhup chan dear
उत्तर द्याहटवाKhup chan tai
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेखन ताई
उत्तर द्याहटवाKhup chhan
उत्तर द्याहटवाKhup Chan vaishu👌👌
उत्तर द्याहटवाMast vaishu
उत्तर द्याहटवा