पत्रलेखन स्पर्धक क्रमांक - २३ : गौरी मनोहर ढोबळे.

स्पर्धक क्रमांक : २३

Name : Gauri Manohar Dhobale

Insta ID : mazi_lekhani_ani_mi

City : Pune

Email id : dhobalegauri912@gmail.com



माननीय मुख्यमंत्री साहेब..

       मी शेतकऱ्याची लेक बोलते🙎🏻‍♀️ मला थोडं सांगायचय . पाहवत नाय😶 आता मला माझ्या बा ची व्यथा.. म्हणून मनात आलं थोडी मांडावी आपल्यासमोर त्याची कथा.. कारण सारेच लिहितात शेतकऱ्याची कथा पण व्यथा मात्र अजून कुणाला कळली नाही. तो जिवाचे रान करतो तरी त्याच्या हाती काय बी लागत नाय.. साऱ्या जगान नुसतच नाव दिलय त्याला जगाचा पोशिंदा. पण वास्तव्यात होते केवळ त्याची निंदा. बिचारा थकलाय हो आता रोज नव्याने सुरुवात करायला जातो, अन सुरुवातीतच शेवट होतो. त्याच्या मालाला देखील नाही मिळत भाव मग त्याने त्याचे घर चालवायचं कसे ? तुम्हीच सांगा राव.. त्याच्यावरचा कर्जाचा डोंगर वाढलाय. आतातर निसर्गानेही साथ द्यायला नकार दिलाय. जगायला आधार मिळा ना झालाय मग तो मृत्यू कडे वळतो अन उपाय म्हणून फाशी घेतो. काय सांगू साहेब माझ्या बा च्या दोस्ता न फाशी घेतली.. त्याला कारण कर्जाचा डोंगर वाढला पोरांना शिकवायला पैसा नाही, लेकीचं लग्न कराया एक पै नाही, घरात अन्नाचा कण नाही मग कंटाळून घेतली त्यांनी फाशी खूप भयानक अवस्था झाली😢 हो त्या मायेची अन त्या लेकरांची..

   बा माझा साऱ्या जगाचा पोशिंदा

 भाळी तयाचा कायम कामधंदा..

 फाशी घेतली की करिती निंदा 

 असा होतो त्याच्या जीवनाचा गोविंदा..😶

     आता एवढेच वाटतंय अशी अवस्था कोणाची होऊ नये माझा प्रत्येक शेतकरी बाप थाटात जगावा. तुम्ही माझ्या शेतकरी बा साठी अनेक योजना राबवता परंतु त्या त्याच्यापर्यंत पोहोचत नाही.. किसान कार्ड काढलं पण ऑनलाईन मुळे अडाणी बा ला ते पण नाही मिळाले. तुमच्या योजना या शेतकरी बा पर्यंत पोहोचतच नाही.. पण फाशी घेतल्यावर बरेच उपाय केले जातात पण माझी अशी विनंती आहे की माझ्या शेतकरी बा ला फाशी घ्यायची वेळच येणार नाही अशी योजना राबवली तर नक्कीच अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. योजना शेतकरी बा

 पर्यंत पोहोचण्यास भर द्यायला हवा.. तरच उभा राहील शेतकरी नवा

    आता एकची माझ्या शेतकरी बा ला द्यावे दान आधार मिळावा फुलवाया रान.😇

                               -- शेतकऱ्याची लेक

टिप्पण्या

  1. खूप सुंदर मांडणी... शेतकरी बांधव आहेत म्हणून आपण आहे... ����

    उत्तर द्याहटवा
  2. So sweet.....keet it up......sagla maharashtra lekh vachun bhavnik krel ashi lekhani.....asch samaj upyogi lekhan krt raha....1 diws cm sudha tumchi dakhal nakki ghetil...

    उत्तर द्याहटवा
  3. शेतकरी दादा आता कासावीस झाला ......
    विकासाच्या नावाचा फक्त बोलबाला......
    खुप केलं, खूप करताय बास कि हो आता .......
    विकासाच्या नावाच्या फक्त आहेत बाता .......

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान लिखाण आहे अर्थपूर्ण आहे

    उत्तर द्याहटवा
  5. खुपच छान मी सुद्धा एका शेतकरायची मुलगी आहे
    तुम्ही खुप लिहता

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट