पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 48- सृष्टी मानकामे

 स्पर्धक क्रमांक 48


नाव: सृष्टी अमोल मानकामे. 

शहर : कर्जत, रायगड, महाराष्ट्र. ई-मेल आयडी : mankamesrushti315@gmail.com




यावर्षी गणपती बाप्पाने खास आपल्याला काही संदेश देण्यासाठी एक पत्र लिहिले आहे.


कसे आहात सगळे? माझ्या वाटणीचेही मोदक खाऊन झाले का ? झालेच असतील नाही का? पढे, लाडू, फळे, मोदक आणि अनेक गोड गोड पदार्थ हे सगळं माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी तुम्हाला खायला मिळतं त्यामुळे अगदी तुमची तर चंगळचं चालू असते.. हो ना...? अरे मुलांनो पण ओळखलत का मला? आई, बाबा , काका, मामा यांची पत्रे तर तुम्हाला रोज च मिळतात पण आज चक्क माझ पत्र दिसल्यावर गडबडूनच गेला असाल ना...? अरे.... इकडे तिकडे काय बघताय हे पत्र दूसरं तिसरं कोणी लिहिलेलं नसून मीच लिहिल आहे... तुमच्या लाडक्या गणपती बाप्पाने...!!! तुम्हाला सगळ्यांना पत्र लिहिण्याच कारण असं की, काल माझ्या विसर्जनाच्या वेळी सगळ्यांनाच अगदी भरून आल होत अगदी घरातील वडिलधाऱ्या व्यक्तिपासून ते नुकतच बोलायला लगलेल्या लहान मुलापर्यंत सर्वांचेच डोळे पाण्याने दाटुन आले होते. माझ्या निरोपाच्या आरतीच्या वेळी तर जेमतेम तुमच्या तोंडून शब्द फुटले पण त्यानंतर सगळे निःशब्द च झाले.

त्यामुळे अगदी न राहुन तुमचा निरोप घेताना गुपचुप फळांच्या टोपलीत् हे पत्र ठेवून मी माझ्या आई कडे म्हणजेच घरी निघालो. यंदा खरच मी समाधानाने तुमचा निरोप घेतला. यावर्षीच चित्र आजपर्यंतच्या गणेशोत्सवांपेक्षा खूपच आगाळंवेगळं होत. सुरुवातीला माझ्या आगमनाच्या दिवशी मी मोठ्या पेचात पडलो दरवर्षी माझ्या अगमनासाठी दिसणारी लाखोंची गर्दी नाही, ढोल ताशांचे आवाज नाहीत, डी जे चा कानाला हानिकारक असणारा आवाज नाही... हे सारं पाहुन क्षणभर मी नक्की पृथ्वीवरच आलो आहे ना ...? यावर माझा विश्वासच बसत नव्हता मग नंतर मला माझ्या भक्तांच्या प्रार्थनांची आठवण झाली आणि कोरोनाने घेतलेल्या आक्राळ विक्राळ रूपाची जाणीव झाली. प्रत्येकाच्या घरी मुहूर्तावर अगदी उत्साहात माझे स्वागत झाले. पण यावर्षीची आतुरता काही न्यारीच होती आणि ती साऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. कोरोनाच्या संकटाने हिरमुसलेले सर्वांचे चेहरे माझ्या आगमनानंतर एक आशेचा किरण शोधू लागले होते.


इतक्या दिवसांत आपल्या घरात या विषाणुने कोणालाच येऊ दिले नाही आणि आज चक्क संकटे तारुन न्हेणारा विघ्नहर्ताच आपल्या घरी आलेला आहे म्हटल्यावर सर्वच जण काही काळासाठी कोरोनाच संकट विसरून आनंदात न्हाउन निघाले होते. यावर्षी मी, मुख्य म्हणजे माझ्या भक्तांच्या प्रार्थना , आरत्या , सजावट इतकच पहिल नाही तर त्यांची कलाकुसरही पहिली. माझ्या, इतक्या सुबक आणि अप्रतिम मुर्त्या त्यांनी घरीच तयार केल्या होत्या की कोणाच्याही डोळ्यांचे पारणे फिटेल...!!! आणि या मुर्त्या शाडुच्या मातीच्या असल्यामुळे मलाही समाधान वाटले. रोज आरत्या, टाळ, मोदक, प्रसाद, अगरबत्तीचा सुगंध, धूप, श्लोक, मंत्र यांच्या मैफीलीत् वातावरण अगदी प्रसन्न आणि शांत झाले होते. अनेक जण माझे दर्शन तर मोबाईलवरुनच घेत होते याची मला तर फार गंमतच वाटली कारण हे असे दर्शन मला प्रथमच अनुभवायला मिळत होते. यावर्षिची सजावट जरी साधी असली तरी त्यामध्ये थरमाकॉल ची गर्दी नव्हती त्यामुळे माझ्या मनासारखी सजावट पाहुन छानच वाटल.

दरवर्षी मोठ मोठ्या मंडळात उगाच स्पर्धा केल्या जातात पण त्यांनीही यावर्षी एकत्र येऊन रक्तदान शिबिरा सारखे सामाजिक उपक्रम राबवले त्यांच्यात झालेला हा बदल पाहुन मला खरच त्यांचा अभिमान वाटला. कित्येक वर्षांनी लोकमान्य टिळकांचा गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देश तुमच्या अश्या कार्यातुन पाहायला मिळाला. माझ्या उत्सवाचा प्रत्येक दिवस शांततेच्या प्रसन्न आणि मंगलमय वातावरणात चालला असल्यामुळे अनेकांना माझ्याशी संवाद साधता आला, छोटयांनी मनमुराद गप्पा मारल्या,खुप जणांनी मिळालेल्या मोठ्या सुट्टीबद्दल "थैंक यू" असे काहीतरी म्हटले एकूणच काय तर सर्वांनाच मनापासून व्यक्त होता आले. खर सांगू का बाळांनो, वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही दरवर्षी सुद्धा माझ्यासाठी खुप छान तयारी करता. माझे सारे भक्त अगदी भक्तिभावाने दर्शनासाठी येतात पण काय सांगू इतकी गर्दी होते ना की दरवर्षी या गर्दी मुळे कित्येक जणांचा चेंगरून मृत्यु होतो. तेव्हा मला काय वाटत असेल याचा तुम्ही कधी विचार केलाय का ...? अरे मी तर जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, सगळीकडेच असतो.

तुमचा प्राण वाचावा म्हणून तुम्हाला खाकी वर्दित दर्शन देऊन सूचनासुद्धा करतो पण तुम्हाला माझे रूप कधी मूर्ती शिवाय बाहेर दिसतच नाही. पण या वर्षी कोरोनाच्या निमित्ताने का होईना ही गर्दी तुम्ही टाळलीत. दरवर्षी असच गर्दी न करता शांतपणे मला निरोप दिलात तर खाकी वर्दितल्या माणसाच्या जीवालाही शांतता राहिल आणि तुमचाही जीव वाचेल. तुम्ही माझ्याकडे अनेक मागणी मागता, नवस करता पण मी आज तुमच्याकडे एकच मागण मागतो , स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुमच्या जीवासाठी अहोरात्र कष्ट करणाऱ्या त्या खाकी वर्दीतल्या देवासाठीतरी निदान नियमांच पालन करा. हे कोरोनाच संकट व्हाट्सएप्प वर "गो कोरोनाचे" स्टेटस ठेउन नाही तर नियमांच पालन करून दूर निघुन जाईल. आणि ते जर तुम्ही केलत तर मग कोरोनासाठी माझ्याकडे प्रार्थना करण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. कोरोना चा अतिरेक च म्हणाल तर तो तर तुम्हीही केला होतात ना... प्रदूषणाचा तर अगदी कहर च झाला होता. माझ्या अगमनाच्या दिवशीच त्या डी जे च्या आवाजाने मी कधी एकदा माझ्या गावी परत जातोय अस मला वाटायच.

विसर्जन करण्याच्या वेळी ते नदीच रूप पाहुन मला नेहमी वाटायचं की अश्या पाण्यात, माणसं अंघोळ तरी करतील का...? आणि हा माणसाने चालवलेला अतिरेक काही केल्या थांबायचे नाव घेत नसल्यामुळे तो थांबवण्यासाठी आणि निसर्गाची किंमत तुम्हाला पटवून देण्यासाठी निसर्गानेच उचललेलं एक पाऊल आहे. तसही तुमच्या मधीलच कोण्या एका थोर माणसाने म्हटलंय ना "क्रिया तशी प्रतिक्रिया" (For every action, there is equal and opposite reaction- Newton). त्यामुळे घाबरून जाऊ नका पण बेफिकीरही राहु नका. पण काहीही म्हणा, या वर्षीचा उत्साह ,माझ स्वागत आणि विसर्जन हे सारं काही पाहुन मी खुपच खुश झालो. पुढच्या वर्षीही माझ असच शांततेत आणि आनंदात नियमांच पालन करून स्वागत करा म्हणजे यावर्षीसारखच पुढच्यावर्षीही मला खूप समाधान आणि आनंद मिळेल.

-सृष्टी अमोल मानकामे.


टिप्पण्या

  1. खूपच छान लिहिलं आहे @काव्यबन्ध

    उत्तर द्याहटवा
  2. फारच छान !! विचार करायला लावणारे! !!����

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट