पत्रलेखन स्पर्धक क्रमांक- 42 समीक्षा भुसारी

 स्पर्धक क्रमांक 42

नाव - कु. समीक्षा मधुकर भुसारी

शहर - मु. पो. सेलू त. सेलू जि. वर्धा

Insta ID - @shabdbhavnache

Email ID - samikshabhusari23@gmail.com


गजानन सोसायटी 

मु. पो. सेलू 

त. सेलू जि.वर्धा

दिनांक - २४/११/२०२०


प्रिय मातृभूमी,

                "नमस्ते सदा वत्सले मातृभूमे

                 त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम्।

                महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे

                पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते ll

कशी आहेसं गं आई तू ? मला तर, फारसं करमतच नाही आहे या लोकांच्या गर्दीत! कारण, वारंवार नको नकोसच चित्र बघायला मिळत आहे. लोकांना सर्व काही सांगून सुद्धा लोक तुला जपतच का नाही याचीच खंत वाटते. जिकडे बघावे तिकडे प्रदूषण, आणि घाणीचे साम्राज्य! भारत सरकारने प्लास्टिक वर बंदी सुद्धा आणली होती तरी, प्लास्टिक वापरतच आहे सर्वजण! एवढं मोठ्ठ कोरोनाच संकट आलयं आपल्या देशावर तरी हे नियम कसले पाळतात. होईल काय व्हायचं ते होऊ दे! म्हणून, बिनधास्त वावरत आहे. एक झाड लावायला लावले की, शंभर छायाचित्र दिसून येते. आम्ही कशाला करावं एवढं म्हणून, इथे प्रत्येकजण मेहनत करायचं टाळतो. खरचं परिस्थिति अशी दिसून येतेय ती म्हणजे, फक्त आणि फक्त..

"आपलीच माडी, आपलीच गाडी न्

आपल्याच बायकोची गोल गोल साडी"

परंतु, तुझ्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे भगत सिंग, सुखदेव, राजगुरू कुठे गेले यांचे बलिदान? जालियानवाला बाग हत्याकांड मध्ये वीर मरण पावणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. चंद्रशेखर आजाद, चंद्रगुप्त मौर्य, राणी लक्ष्मी बाई यांचा जणू यांना विसरच पडला की काय असचं वाटतं! 

           भारत हा कृषिप्रधान देश आहे. पण, या देशाला कायम कृषिप्रधान म्हणून ठेवावं हे शेतकऱ्यांना सोडून बाकी कुणाला का वाटत नसावं हे सुद्धा डोक्यात कायम गोंधळत असतं. शेतीत मोती उगवणा-याची सुद्धा जीवघेणी स्पर्धाच चालू आहे जणू. त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला नाही तर ते फाशी लावतात. जे तुला जपायचं म्हणून राबराब राबतात त्या किसानाकडेच लोक तुच्छ नजरेने बघतात.

खरचं लोक विसरत चालले आहे लाल बहादुर शास्त्रीने दिलेला 'जय जवान जय किसान चा नारा'! 

आई तुझ्यावरच आमचं सर्वस्व अवलंबून आहे. एवढा आम्हा सर्वांचा भार सोसतेय तरी पण, तुला जपायचं माञ हे विसरतात. आई तू तुझ कर्तव्य नीट पार पाडतं आहे वारंवार आम्ही चुकलो जरी ना तरी तू सांभाळून घेतच आहे पण, कुठपर्यंत चालायचं गं असं! कर्तव्य यांचे पण आहे ना काही ना काही त्याच कायं? मला तर हे वास्तविक चित्र बघून कविता सुचली ती अशी की, 

"बघ आई! आकाशात हा सूर्य आला, 

मात्र लोकांच्या डोक्यात प्रकाश नाही झाला. 

लोकसंख्या वाढली अन् जागा कमी झाली. 

जिकडे तिकडे मात्र फ्लॅट संस्कृति आली... 

खेडे कमी आणि शहरे वाढू लागली! 

जिकडे बघावे तिकडे प्रदूषण आणि घाणच दिसू लागली. 

सुंंदर अशा पृथ्वीचा अस्त होऊ लागला.. 

तरीसुद्धा माते आमच्यासाठी हा सूर्य उगवू लागला... "

           तुला सांगायचं बरंच काही होतं पण, अजून कुठले बदल होतात हे कळवेलं नंतरच्या पत्रात. आणि खूप खूप आभार कारण, कोरोनाचं सकंट असतांना सुद्धा तू तुझी छाया आमच्यावर मायेनेच ठेवून आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा याची उणीव भासू देत नाही यासाठी! अशीच कृपा सदैव असू दे! माझ्याकडून जेवढे प्रयत्न होईल तुला सांभाळून ठेवण्याचे तेवढे मी नक्की करेल. आणि, लोकांमध्ये काय बदल होत हे नतंर नक्की कळवेलं.

                                                     

 तुझीच लाडकी

 समु

टिप्पण्या

  1. खूपच छान 👌अगदी मनाला प्रसन्न करणारे पत्र आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट