पत्रलेखन स्पर्धक क्रमांक : 38 - हर्षदा युवराज भंगाळे
स्पर्धक क्रमांक : ३८
नाव : हर्षदा युवराज भंगाळे.
इंस्टाग्राम आयडी : @_harsh_vichar
शहर : मुंबई
ईमेल आयडी : harshadayb99@gmail.com
पत्रलेखन (एक पत्र.."स्वत:लाच"!)
आज एका पत्रातून बोलावसं वाटतंय.."प्रत्येकातल्याच स्वतःशी"! लिहायचंय आपल्याविषयी आणि कळवायचंही आपल्यालाच, तेही स्वतः आपणच! खरं तर कठीण वाटतंय! कारण दरवेळेस तर आपल्या मनातल्या आपल्याशी अगदी प्रत्येकाच्याच गप्पा चालू असतात, त्या तर कधी थांबतच नाहीत. आणि विशेषकरून त्यात बोलतांना कट्टीबट्टी हा प्रकार नसतो. केव्हाही बोलायला लागा, मन नेहमी तयार!
आजही अस्संच बोलायचंय!
तर..
प्रिय "स्वतः आपणच",
आज खास बोलायचंय तुझ्याशी आणि दरवेळेससारखं आज गप्पा नाही हा मारायच्यायत मला! आज तुझ्याशी बोलावसं वाटलं कारण, आतापर्यंतच्या खूप चुका आणि तक्रारी करायच्यायत मला तुझ्याकडे! दुसऱ्या कोणाच्या नाही हा, त्या तर तुझ्याच आहेत!!
सर्वात पहिली तक्रार..
आयुष्य आहे म्हणजे संकटं तर येतीलच ना. जगायचं म्हटलं तर अडचणी येतीलच, त्यांना हसत-खेळत सामोरं जायचं सोडून त्या संकटांना घाबरण्यात काय अर्थ आहे? अस्सं नेहमीच होतं बरं तुझ्याकडून! एकंच आयुष्य आहे ना! मग हसत-खेळत संकटांना सामोरं का नाही जाता येत तुला?
दुसरी तक्रार..
जगणं म्हंटल तर आयुष्यात चांगले वाईट अनुभव हे येतीलच ना, मग येऊदे ना त्या अनुभवांना! चांगले अनुभव असतील तर त्या आठवणींना घेऊन पुढे चालायचं आणि वाईट असतील तर त्यांना तिथेच मागे ठेऊन पुढे पळून यायचं. अस्सं का नाही करता येत तुला? नेहमी-नेहमी अस्सं काही झालं की तुला कशाला खचून जायला हवं? अस्सं,नेहमी कसं काय होतं रे तुझ्याकडून? जर वाईट अनुभव आले आणि ते जर तुला विसरता येत नसतील ना, तर देवाला दोष देऊन "माझ्याच नशिबात अस्सं का? मीच का..?" अस्सं बोलण्यात काही अर्थ नाही. यात चुकी तुझी आहे कळलं!
तिसरी तक्रार म्हणजे..
कधी काही वाईट घडलं तर अस्सं होतं म्हणून अस्सं झालं किंवा त्याने तसं केलं म्हणून अस्सं वाईट झालं हे अस्सं का बोललं पाहिजे, हे चूकीचय कळलं!
चौथी तक्रार म्हणजे..
लोक! काही लोकांमुळे होतो त्रास. त्यांच्या वागण्याने, त्यांच्या केव्हा-केव्हा फक्त गरज पडली की बोलण्याने होतो त्रास मान्य आहे. पण, जगंच ना हे मग त्यात जितके चांगले लोक असतील तितकेच असेही लोक भेटणार आहेतच आपल्याला! मग त्यांचा त्रास का घ्यायला हवा तुला? का त्यांच्या वागण्याने तू तुला त्रास करून घेतो? जर कोणी वाईट वागलं आणि आपल्याला ते पटलं नाही ना, तरी आपण माफ करून टाकायचं त्यांना मनातून! मग सगळं बरोबर वाटतं. हे अस्सं करायचं हा पुढच्या वेळेपासून!..कळलं?
पाचवी तक्रार म्हणजे..
कोणी काही बोललं जे तुला आवडलं नाही, मग ते तब्येतीवरून असो की कोणत्या वेगळ्या न आवडणाऱ्या गोष्टीवरून! उदास नाही व्हायचं, तर ते पटवून घ्यायचं आणि त्याच गोष्टीवरून हसायचा एकेक बहाणा शोधायचा. आजूबाजूच्या लोकांना हसायला लावायचं. एक लक्षात ठेव, आपल्यामुळे जर कोणी हसलं ना..मग ते आपल्यातल्या कोणत्या कमीपणाच्या गोष्टीवर असलं तरी ते छानच असतं. लोकांच्या हसण्याचं कारण जर आपण स्वतः असू ना तर त्यासारखी आनंददायी गोष्ट कोणतीच नाही..कळलं येडू? त्यामुळे नेहमी कितीही काही झालं तरी आनंदी राहायचं आणि उदास न होता सर्वांना आनंदी करायचं, त्याच गोष्टीवरून!
आणि आता शेवटची तक्रार जी महत्त्वाची आहे ती म्हणजे,
तुझ्यातलं हे मन आहे ना, हे खूप कमजोर आहे. हो..कमजोरच आहे! कोणाच्या बोलण्याचा, कोणाच्या वाईट वागण्याचा ना त्याच्यावर लगेच परिणाम होतो. बिचारं तेही किती सहन करणार! त्यालाही किती प्रकारचे टेंशन असतील, कोणा कोणाला सांभाळणार तेही! त्याला ना जपून वागवायला हवं, त्याला त्रास नाही झाला पाहिजे. कधी काही झालं ना..जसं की रडायला तर आपल्याला असंही केव्हाही येतं. मग मी तर म्हणते रडून घ्यायचं, मग एकट्यात असो किंवा सर्वांसमोर! आणि रडतांनाच सगळं विसरून जायचं. पण त्या मनाला त्रास नाही झाला पाहिजे परत अस्सं रडून घ्यायचं! कारण या आयुष्यात अस्सं सगळं होणारच आहे ज्याचा त्रास होत जाईल, पण आपल्यावर आहे न आपण त्या परिस्थितीला कसं समोर जातो. एक वाक्य ऐकलेलं, "जर परिस्थिती बदलता येत नसेल तर मनस्थिती बदलावी." तसंच काहीसं आपल्याही बाबतीत करावं. आनंदाने जगायचंय नेहमी इतकचं! कळलं?
आता सगळ्या तक्रारी तर झाल्या तुला सांगुन! आज तुला असंही वाटलं असेल, "अरे यार, आज गप्पा तर काहीच नाही मारल्या अन् फक्त चुका सांगितल्या माझ्या! पण एक सांगू का, तुला हे सगळं सांगणही गरजेचं होतं. आता जर सांगितलं नसतं तर तुझ्याकडून या चुका पुन्हा-पुन्हा घडल्या असत्या आणि त्याचा त्रास आपल्याच मनाला झाला असता ना! तो त्रास नको हवा होता आता फक्त यापुढे! मान्य आहे तुला या जगाचा, त्या वाईट अनुभवांचा, वाईट वागलेत अशा माणसांचा जाम राग येत असेल..वाईटही वाटत असेल, रडत असशील..पण एक खरं-खरं सांगू? एका चित्रपटात ऐकलेलं, केव्हा वाटलं की कोणी त्रास दिला किंवा वाटत असेल कोणामुळे आपल्याला आनंद मिळाला, तर मग अशा सर्वांना एकदा डोळे बंद करून Sorry आणि Thank you बोलून टाकायचं! बस्स इतकं केलं ना, मग बघ मन कस शांत होऊन उड्या मारायला लागतं. कारण हे करून आपण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टींना नीट करतो! एकच तर आहे आयुष्य..खूप जगायचं, खूप हसायचं, खेळायचं. ते तर आहेच की कधी-कधी मन आपोआप उदास होतं. पण ठिके ना..थोड्यावेळ राहील मग परत आधीसारखं बनून हसायलाही लागेल..जीना तो इसिकाही नाम है ना!!
तुझ्यातलीच,
"मी" स्वत:!
छान!🥰
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवाखूप च सूंदर लिहिलंय हर्षदा तू 👌😘
उत्तर द्याहटवाकल्पना आणि विचार खुप सुंदर आणि त्याची शब्दात मांडणी तर अजुनच सुंदर😍🔥 Keep writing and pouring your heart out♥️✨
उत्तर द्याहटवावाह... मस्तच..!!
उत्तर द्याहटवाKhup chhan g harshada❤❤😍
उत्तर द्याहटवाAs usual best ☺️
उत्तर द्याहटवाखूपच छान💯💯💯❤️
उत्तर द्याहटवाखूप सुंदर लेखन...हर्षदा 😍😍👌🏻
उत्तर द्याहटवाअप्रतिम..दुसरे शब्दचं नाहीत!!
खूप सुंदर ❤️🌟
उत्तर द्याहटवाmast❤❤
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर हर्षदा��
उत्तर द्याहटवाMasta ❤️❤️
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाकाही आठवणी नाही विसरता येत, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे नाही का? खूप सुंदर लिहिलं आहेस, सगळ्या तक्रारी मान्य 💯
उत्तर द्याहटवाKhup Chan lihaly 👌
उत्तर द्याहटवाखूप छान लेखन!जणू काही प्रत्येकाच्या मनातील भावनांना वाट करून दिली आहे!🤗
उत्तर द्याहटवाKhuppp sunder....❤️❤️👌
उत्तर द्याहटवा