पत्र लेखन स्पर्धक क्रमांक 36 -विशाल पांडुरंग मगर


स्पर्धक क्रमांक 36 

 नाव -विशाल पांडुरंग मगर

शहर- कन्नड, संभाजीनगर

Insta id @best_word_elixir2424

Email id vishalmagar24@gmail.com


एसटीचा आत्म लेखन पत्रलेखन



मी तुमची  एसटी बोलतेय.... 


नमस्कार, सर्वांचे दिवाळी मजेतच झाली असेल ना....मीही तुम्हा सर्वाची दिवाळी गोड करण्यासाठीच व्यस्त होते, कारण इतक्या दिवसानंतर कोरोनाच्या काळानंतर मी रस्त्यावर धावत होते याचा आनंद जरा वेगळा होता, खूप दिवस आराम केला, त्यामुळे जरा धावण जड जात होतं तुम्हा सर्वांची साथ भेटली त्यामुळे जरा ऊत्साह आला आणि त्यात दिवाळी येऊन गेली, तर खुप छान वाटल , सर्वांना ने आण करणे दिवाळी असल्यामुळे प्रत्येकाला वेळेत घरी पोहोचलो ते माझं काम चालू होता त्यामुळे जरा निवांत बोलावसं वाटलं असे म्हणून सर्वांना मनातले पत्र लिहिले.... 



 दगडफेक करणाऱ्या आंदोलकांनो, बांधवांनो तुम्हाला आज काही बोलायचंय मला मी तुमची एसटी जीवनवाहिनी महाराष्ट्राची करती धरती, मी महाराष्ट्रभरात जाते येते गावोगावी एकही गाव सुटत नाही तिथे  जाते गोरगरीब प्रवाशांना ,श्रीमंतांना माझ्या समान जागेवर बसवते मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हक्काची अशी तुमची गाडी वाटते होना नक्कीच ना  मी तुमची सेवा स्वतंत्र काळाच्या नंतर वर्षांनंतर ही करते 70 वर्षाची झाली आहे. . 


माझ्यात खूप बदल झाले प्रगतीनुसार, काळानुसार मीही खूप बदलत गेले आणि तुमच्या सेवेत जशी तत्परता दाखवता येईल तशी मी दाखवत गेले पण तुम्ही मला खरंच जाणून घेतलं का ? तुम्ही मला ऐकून घेतलं का? माझा गोरगरीब चालवणारा ड्रायव्हर, कंडक्टरची तुमची सेवा दिनरात करत आहे अजूनही करताय करत राहतील, मग तुमच्यावर मी दुःखी  का ? हा तुम्हाला एक प्रश्न कधीतरी पडला पाहिजे असता ना कधीतरी वाटलं असावं की एसटी च ही काहीतरी दुःख असेलच ना तुमच्याप्रमाणेच मला सुखदुःख असतात ,तुम्ही जेव्हा दिवाळीला गावात जातात तेव्हा मला आनंद होतो ,तुम्ही जेव्हा कोणी एखादा विद्यार्थी माझी आतुरतेने वाट पाहतो तेव्हा मला आनंद होतो , म्हणजे जेव्हा एखादी आई बहीण तिच्या माहेरी जाते व माझी वाट पाहत या गावातून त्या गावात जाते काय त्यांनाही अजूनही माझ्यावर अवलंबून आहेत तेव्हा मला त्यांची काळजी घ्यावीच लागते मलाही सुख दुःख आहे हो आम्ही निर्जीव वस्तू ती वेगळी गोष्ट पण आम्हालाही कुठेतरी भावना असतीलच ना. . . 



जेव्हा कोणी आंदोलक कोणताही विचार न करता माझ्यावर दगडफेक करतात, कोणताही बंद, हिंसाचार करताना पहिले मलाच लक्ष करता, मला पेटवताना माझ्या मनाचा कसलाही विचार तिथे होत नाही , मला जळताना पाहून त्यांना आसुरी आनंद होतो ,त्यांना आपण युद्धात विजय मिळवला असं वाटून, पण मित्रा खरंच हे करून तू तुझं काम सफल करतोय किंवा तुझे हेतू  खरच साकार होताय नाही ना .... 

फक्त मी सरकारची तुमच्या हक्काची गाडी म्हणून मला तुमच्या दुवा म्हणून मला मध्ये आणता आणि माझं मरण करून तुम्ही मला वाऱ्यावर सोडता..... 😢


ए करून तुम्हाला काय वाटतं ते ते तुम्हाला काय वाटतं ते ते तरीही एकदा मला नक्की जिवाचा आकांत करून सांगा ऐकेल मी नक्की ....

हेच  कमी की काय गाडीत  कचरा करणे ,बस स्टँड च्या आवारात च्या आवारात अस्वच्छता पसरवणे,माझ्यां कडंक्टर ड्रायव्हरना शिव्यांच्या लाखोल्या वाहणे, अशी एक ना एक बरेच प्रताप तुम्ही करत असतात तुमचे जशा हक्क असतात तसे काही कर्तव्य मुलभूत काही कर्तव्य हे तुम्ही विसरत चालला आहे



शेवटी बाबांनो मला चांगलं ठेवा मी तुम्हाला चांगलं ठेवेल ठेवा मी तुम्हाला चांगलं ठेवेल माझा निस्वार्थ रुपी भाव तुम्हाला देते तुम्ही निस्वार्थ फक्त मला प्रेम द्या तसेच केल्यास मला अजून भरारी भेटेल आणि खूप काही... करून हजारो कर्मचाऱ्यांचे पोट माझ्यावर चालते ते केल्यास त्यांच्या कुटुंबालाही आनंद भेटेल, तुमचे हे पुण्य मामाझ्यासोब त्यांच्या कुटुंबालाही कामा येईल हे नक्की सांगतो


हे माझे पत्र वाचून तरी तुम्ही यापुढे असं काही करणार नाहीत करताना नक्कीच विचार कराल आणि आपले कर्तव्य काय आहेत याचा विचार करूनच तुम्ही दगड उचलण्याचे आधी माझ्यापुढे नतमस्तक व्हाल अशी आशा बाळगतो आणि तुमची रजा घेते.. 

चला प्रवास येतायेत दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आहेत चला मी त्यांना सोडायला जाते बाय-बाय... 


 तुमचीच -

लाडकी लालपरी 🚌🚎🚌🚎

मुक्काम पोस्ट सारा महाराष्ट्र

पोस्ट -  सेंट्रल बस स्टँड, मुंबई.. 😊🙏

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट