पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 27- प्रेमराज जायभाये
स्पर्धक क्रमांक 27
नावं:प्रेमराज जयभाये
गाव:बीड
Email id:Jaybhayepremraj143@gmail.com
Inst id:jaybhaye_prem01
आई-बाबास पत्र
प्रिय स्वर्गीय आई -बाबा ,
आज जरा एकट वाटलं ,तुम्हा दोघांची खूप आठवण येते.आज थोडस मन मोकळं कारावास वाटलं
आई-बाबा तुम्ही मला जन्म देऊन हे जग दाखवलं पण या जगात तुम्ही गेल्यावर राहायचं कास हे सांगायचच विसरून गेलात.
बाबा तुम्ही मला हात पकडून चालायचं शिकवलं पण तुम्ही कधी हात सोडुनगेलात कळलंच नाही,
आज स्वतःच्या पायावर उभा असलो न तरी धडपडल्यासारखं वाटलं.
आज जरासं मन मोकळं कारावास वाटलं..
आई तू रोज माझ्यापाठी जेवणाचं ताट घेऊन फिरायची अन म्हणायची बाळा थोडस खाऊन घे ,
आता ते बाळ नाहीय आई तुझ्यापाशी, त्या बाळासाठी
थोडस रुसावस वाटलं..
आज थोडस मन मोकळं कारावास वाटलं..
एकदा घरात एकटा असताना सारं घर रडून डोक्यावर घेतले होत पण तुम्ही दोघांनी आम्ही आहोत
सांगितले होत,आज हजारोंच्या गर्दीतसुद्धा एकट वाटलं..
आज थोडस मन मोकळं कारावास वाटलं ...
आई-बाबा तुमची आठवण मनातून कधीच
जाऊ शकली नाही,आज भरलेल्या आभाळा बरोबर
डोळ्यात पाणी दाटल्यासारखं वाटलं...
अजून काही नाही,आज तुमची आठवण आली म्हणून थोडस राडावस वाटलं...
आई-बाबा🙏🏼🙏
तुमचाच
मी
खुप अप्रतिम लिहिलेलं आहे लेखकांनी.... 😥
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवाVery nice
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवा