पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 26- नेहल जोशी

 महाराष्ट्र कवी मंच स्पर्धेसाठी 

प्रकार = पत्रलेखन✉️

 स्पर्धा क्रमांक 26

दि. 9/11/2020

नाव = कु. नेहल जोशी 

इन्स्टा आयडी = 8974_ anu

जिल्हा = अहमदनगर 

ईमेल =

joshinehal2005@gmail.com 

 

   *✍️ *कोरोनास पत्र* ✍️


शत्रू - मानवसंहारक कोरोना,  


विषय = सर्वसामान्य माणसाचे कोविड काळातील  अनुभव व्यक्त करण्याबाबत...


हे कोरोना, मार्च पासून ठिय्या मारून बसला आहेस आमच्या चिमुकल्यांच्या या स्वप्नाळू विश्वात. आमची शाळा तर बंद केलीच पण संपूर्ण जगालाच तू कुलूप लावून टाकलं. पण आमचा दादा विज्ञानाचा अनोखा आविष्कार...म्हणजे मोबाईल रे... तो आला आमच्या मदतीला धावून आणि ऑनलाईन का होईना शाळा सुरू झाली. अरे दृष्ट कोरोना तू तर देवळाची दारं सुद्धा बंद केलीस... पण काही फरक नाही पडला हं ! आमचा देवबाप्पा डाॅक्टर, पोलिस, सफाई कामगार यांच्या रूपात त्याच्या लाडक्या भक्तांच्या रक्षणार्थ धावला. पण एक लक्षात ठेव बरंका आमच्या या पवित्र भारतभूमीत जास्त दिवस थांबण्याची तुझ्यात हिंमत नाही. बघ आता आम्ही जबाबदार नागरिक आता सॅनिटायझर, मास्क, सुरक्षित अंतर ही हत्यारे घेऊन कसा पळवून लावतो बघ तुला!!!

खरंतर आम्हा माणसांकडे एका मोठ्या गोष्टीची कमी होती म्हणूनच तुला शिरकाव करता आला. आणि ती गोष्ट म्हणजेच "माणुसकी". आत्ताचा विज्ञानयुगातील माणूस इतका भौतिक सुखाच्या मागे लागला की स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षेचं महत्व आता त्याला पटलं.

माणसाला हे समजले की गरजेच्या वेळी गर्वाची, श्रीमंतीची, सन्मानाची दारे बंद होतात.. आणि तेव्हा जीवन घडवण्यासाठी उपयोगी पडते ती फक्त परस्परांमधील आपुलकी आणि माणुसकी. परंतु हे कोरोना, आता आम्हाला हे सर्व उमजलं बरंका.. त्यामुळे चल आता तू बॅग भरून ठेव, तयारी कर.. निघायचं आता लवकरच तुला.... !!


तुला न आवडणारी 

एक शालेय विद्यार्थिनी,

कु. नेहल जोशी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट