पत्रलेखन स्पर्धक क्रमांक - 25 चैतन्य काळे
स्पर्धक क्रमांक 25
नाव- चैतन्य काळे
इंस्टा- chaits_life
शहर - पुणे
ई मेल- chaitanyakale09@gmail.com
प्रिय,
मायबोली मराठी,
खरंतर शब्दांची मैफिल चैतन्यमय वातावरणात रंगत जावी अशीच तू समृद्ध भाषा,उजवीकडून डावीकडे लिहीत जाव अशी देवनागरी किंवा बाळबोध लिपी म्हणजे तुझी दुसरी ओळख. तुझ्यातले बारकावे आम्हाला आता कुठे कळायला लागलेत जेव्हा कुठे आम्ही आमची नाळ साहित्यक्षेत्र अन् लेखणीशी जोडण्याचा प्रयत्न केलाय पण तुझ्यावर प्रभुत्व मिळवणं ही तस अवघडच कारण संभाषण,श्रवण,सुंदर लेखन अशा विविध कौशल्यावर तू आज ही विराजमान आहेस. संस्कृत भाषा ही तुझी जननी पण आमची मात्र तूच मायबोली मराठी. ज्येष्ठ साहित्यिक कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस तुझ्या चरणी "जागतिक मराठी भाषा दिन" म्हणून अर्पण व्हावा इतकी तू गौरवशाली आहेस. अलंकारिक भाषेचा दर्जा आजही तुझ्याकडे असणं म्हणजे तुझ्या प्रतिभेचा सन्मानच म्हणावं लागेन. लोकशिक्षणाची आदिमाया म्हणून आज ही तुझीच ओळख सांगितली जाते.कादंबरी,ग्रंथ,लेख,वृत्तपत्र,कविता,आणि पत्रलेखन हे सर्व तुझ्या अस्तित्वाचे प्रबळ दावेदार पण आज तुझ्यावरच पत्र लिहायला सुचाव हे खरंतर मी माझं भाग्य ही समजतो आणि तुझ्यावर होत असणारे अन्याय मात्र दुर्भाग्यच.
इ. स.९८३ पासून तुझं अस्तिवाची ओळख असणारी तू जागतिक राजभाषा आज स्वतःच अस्तित्व टिकविण्याची झगडावं ही शोकांतिकाच. तुझ्यासाठी राजकीय हस्तक्षेपाची गरज भासते ही तर आमची नामुष्की म्हणणंच योग्य ठरेल कारण परकीय भाषेचा उदोउदो करत आम्ही इतर व्यक्तीसोबत इतर परकीय भाषेत बोलायचं आणि मग मुंबई वर तुझ अस्तित्व संपतय असं खापर फोडून तुझा अपमान करण हे मात्र नित्याचाच झालंय अन् तेच कुठेतरी मनात सलतच असतं. तुझ्यामुळे आज ही आम्हाला मराठी म्हणून ओळख टिकवता आलीय,तेव्हा तुझ मरण म्हणजे ह्या संस्कृतीची ती विझलेली पणती असेन तर सुरेश जींच्या लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी....या शब्दलंकारित तुझ्या गौरवशाली वैभवाला गेलेला तो तडा असेन इतकं मात्र नक्की.
बदलत राहणीमान आणि शैक्षणिक प्रणाली मुळे कुठे तरी तुझा वावर कमी झालाय पण त्यात तुझे धडे देणाऱ्या मराठी शिक्षण प्रणालीचा विकास त्या वेगाने केला गेला नाही आणि कदाचित त्यामुळे परकीय भाषेच आक्रमण शैक्षणिक प्रणाली मध्ये झालंय यात तीळमात्र शंका नाही.
असो एक पत्रलेखन म्हणजे तुझ्यावर आधारित हा एक प्रकार अन् इथे ही लिखाणावर काही मर्यादा असतातच पण हो एक मात्र नक्की लेखकाची लेखणी जोपर्यंत या साहित्यक्षेत्रात लिहत राहीन तोपर्यंत तुझं अस्तित्व हे अविभाज्य असेन इतकीच शाश्वती सध्या तरी देऊ शकतो.
तुझाच भाष्यप्रेमी,
चैतन्य काळे
अप्रतिम✍🏻
उत्तर द्याहटवाThanks
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाशब्दरचना👌 मराठीभाषाप्रेम प्रत्येक शब्दातून दिसून आलंय, छान लिहलं👍😊
उत्तर द्याहटवा