पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 24- विजय दांदळे
स्पर्धक क्रमांक 24
नाव : विजय हिम्मतराव दांदळे
इन्स्टा आयडी : __ae__dil__hai__mushkil_
शहर: अकोला
ईमेल आयडी: dandalevijay74@gmail.com
प्रिय भगवंता.....
नेमका कुठं आहे रे तू? मंदिरात डोळे मिटून तुझी वाट पाहत बसतो मी, देवघरात दररोज तुझ्या भेटीच्या आशेने ताटकळत उभा राहतो. खूप इच्छा आहे रे तुला भेटायची, खूप काही विचारायचं आहे तुला, खूप काही सांगायचं आहे. पण मला माहिती आहे की तुला भेटणं इतकं सोप्पी नाही. आणि म्हणूनच आपल्या भेटीआधी तुला पत्र लिहितोय बरं का, वेळ मिळाला तर नक्की वाचशील आणि शक्य झालं तर उत्तर ही पाठवशील.
तुझ्या अस्तित्वाबद्दल शंका असती तर मी तुला पत्र लिहिलच नसतं. पण तुझ्या खऱ्या रुपाबद्दल एक ओढ बिंबून गेली आहे आता मनात. तुझा मानव म्हणजे कल्पनेचा तरू आहे आणि त्याने तुझ्या रुपाची खूप सारी फळ उगवून ठेवली आहेत रे. असं असलं तरीही त्यातील प्रत्येक फळाचा मी चाहता आहेच, पण शेवटी कल्पना ती कल्पनाच ना, म्हणून तुझ्या खऱ्या रुपाची आस आहे मला. असो ही तर माझी इच्छा झाली, पण तुझ्याच जगातील एक गोष्ट सांगतोय मी तुला. तसा तर तू सर्वज्ञाता आहे, तुझ्यापासून काय लपलेलं आहे. पण तरीही ऐकून घे माझ्याकडून.
माणूस नावाचं घर बनवताना माणुसकीचा पाया त्यात रोवला असेल तू, पण आता हळूहळू तो पाया ना धासळायला लागला आहे. पाया कमजोर व्हायला लागला, म्हणजे घर धोक्यात येणारच की. तसचं काहीस होत आहे आता तुझ्या जगात. बघं ना, द्वेष, मत्सर, लबाडी आणि स्वार्थ अश्या झटक्यांनी माणुसकीचा पाया अगदी जर्जर करून टाकला आहे, आणि नको त्या उंचीच्या लोभाने माणूस रुपी या घराचं अस्तित्वच धोक्यात येऊन ठाकलय. तू तर खूप मस्त आकार दिला होता रे या जगाला, परंतु त्या आकारात आता खूप विकार फोफावत आहेत. आणि या विकारांच औषध आता तुला लवकरात लवकर शोधणं, कमप्राप्त झालं असेल. आणि तू ते आमच्या मनात रुजवशिल याचीही खात्री आहेच.
आम्ही तेहेतीस कोटी रुपांची पूजा करणारे हिंदू असो, अल्लाह ला नमाज अदा करणारे मुस्लिम असो, किंवा गुरुद्वारात पाया पडणारे शीख असो, सर्वांना तुझ्या बद्दल आदर आहेच रे. परंतु मला वाईट एवढंच वाटतं रे देवा, धर्माच्या नावाखाली आम्ही आमच्या निर्मात्यालाच वाटून बसलो आहोत. आणि ह्या धर्मरूपी झाडाच्या मुळा इतक्या खोलवर रुजल्या गेल्या आहेत ना, की ह्यांना सहज उपटण शक्य नाही. असो, पण एवढं करशील भगवंता, की आम्हा सर्वांना एकत्र राहण्याची सद्बुद्धी देत राहशील कारण माणुसकीला या धार्मिक तीव्रतेपासून वाचवलेलचं बरं.
देवा, तुझ ऋण फेडायचा, आम्ही विचार न केलेलाच बरा. परंतु तू केलेल्या उपकारांबद्दल आम्ही ऋणी असणं गरजेचं आहे. खरंच देवा तू दिलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुझे आभार. चल भगवंता, आवरतो आता. कधी वेळ मिळाला तर नक्की येशील भेटायला.....
सर्वस्वी तुझाच
विजू.....
खुप मस्त विजय. तुझे निर्दोष प्रश्ण देव नक्की समजुन घेणार.
उत्तर द्याहटवाखुप मस्त विजय. तुझे निर्दोष प्रश्ण देव नक्की समजुन घेणार.
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर लेख लिहला आहे विजय...... 👌👌👏👏..... All the best beta....👍👍
उत्तर द्याहटवाKhub chan bhava ..khrach mansatun manuski kuth tri harvat chali ahe
उत्तर द्याहटवाKhup masta bhai
उत्तर द्याहटवाखूपच छान विजू...keep it up ��
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर 😊👌
उत्तर द्याहटवाखुप छान...
उत्तर द्याहटवाखुपच सुंदर विजू 👌👌
उत्तर द्याहटवाNice 👍👍
उत्तर द्याहटवाKhup Sundar viju 😊👍👌👌 निर्माल्य आणि निर्दोष मनाने मांडलेले पत्र देवा बाप्पा कडे पोहचले 🙏👍
उत्तर द्याहटवासुंदर
उत्तर द्याहटवा🙌🙌👏❣️
उत्तर द्याहटवाखुप छान💫
उत्तर द्याहटवाKhupch chhan..bhaiya
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख विजू.... 😍❤️
उत्तर द्याहटवाखूप भारी 🙌
उत्तर द्याहटवाMahol yrr bhai
उत्तर द्याहटवाखुप सुंदर विजय तरुण पिढीला अश्या विचारांची गरज आहे. तुझे विचार भविष्यात पण आमच्या पर्यंत पोहोचवू दे.
उत्तर द्याहटवाखूप छान भाऊ👍👍👍👍
उत्तर द्याहटवाKhup chan bhai keep it up
उत्तर द्याहटवाIncredible and booming words ...💯 Hats off to your writing
उत्तर द्याहटवाMast vaijay beta kahrch khup chan lihto tu .ani tu jay on lihto na te rutu mala nahim aaikte khup chan beta Asch liht raha ani pude ja
उत्तर द्याहटवाअतिशय सुरेख विजू दादा
उत्तर द्याहटवाAple likhan apratim ahe
उत्तर द्याहटवाKhup chan ...👍👍👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख विजय , सुंदर विचार मांडले आहेत तु 👍🏻👍🏻
उत्तर द्याहटवाKhup khup khup Cha👍👍👍
उत्तर द्याहटवाSuperb bro
उत्तर द्याहटवाKhup chan bhau
उत्तर द्याहटवाNice 👌👌khup chaan
उत्तर द्याहटवाउत्कृष्ट लेखन👏👍
उत्तर द्याहटवाNice Vijju bhai अतिसुंदर ❤
उत्तर द्याहटवाGood👍
उत्तर द्याहटवाखूप चांगल्या पद्धतीने माणूसकीची किंमत समजावून सांगितली दादा.👍❣️
उत्तर द्याहटवाअप्रतिम लेख ❤️❤️
उत्तर द्याहटवा