पत्र लेखन स्पर्धक क्रमांक 22 - मृणाली पाटील
स्पर्धक क्रमांक 22
नाव :- मृणाली पाटील
इंस्टा आयडी :- @poetic_mrunali
स्पर्धाकाचे शहर :- अमरावती (महाराष्ट्र)
ई-मेल आयडी :- mrunu15@gmail.com
प्रिय कोरोना,
कसा आहेस? मजेतच असायला हवास तू, रमलाय ना छान.! म्हटलं आज तुला पत्र लिहावं, घ्यावा तुझाही थोडा हालहवाल. नाही म्हणजे, नऊ महिने झालेत ना तुला येऊन भारतात, तर आला सहजच विचार. तशी आमची पद्धतच ही, पाहुणे म्हणजे देवच मानतात इथे. एव्हाना तुला आमचं ब्रिदवाक्य माहिती झालं असेल - “अतिथी देवो भवं:”.
तुला म्हणून सांगते, तू आलास ते बरंच झालं. अरे, म्हणजे तुझ्या येण्याने सर्व घरची माणसं एकत्र बसून जेवायला लागली, खेळ खेळू लागली, हिंदी-मराठी चित्रपटाच्या मैफिली टीव्ही वर रंगायला लागल्या, ज्यांना स्वयंपाकघरात पाऊल टाकलेलं कोणी पाहिलं नसेल, त्यांनी चक्क विविध पदार्थ बनवले. केक ही सर्वांची सर्वात आवडती डिश बनली असावी या काळात. कारण सर्वात जास्त तेच बनवलं गेलं. खूप घरांमध्ये, जी मुलं शहरांत, परदेशात कामासाठी वा शिक्षणासाठी गेली होती, ती परतली. परिवारासोबत राहून दूर गेलेल्या आपुलकीच्या भावना पुन्हा जाग्या झाल्या. अशा अनेक चांगल्या गोष्टींसाठी तुझे आभार.
हा, काहींचे ठरलेले लग्न लांबले, तर काही फक्त दोघेच असलेले वृद्ध आजी-आजोबा एकटे पडले. मानसिक रोगी, दिव्यांग व्यक्तीना घरात कोंडून नाही ठेवता येत जास्त काळ, अशांचे फार हाल झालेत. मुलांच्या शाळा-महाविद्यालये पासून ते मंदिर-मशिदी सर्वच तुझ्यासाठी बंद झालं. घरकोंडीने विचारांचा, मानसिकतेचा, आर्थिक, सामाजिक, अशा सर्वच बाजूंचा कोंडमारा झाला रे. मला माहितीये की, तू कोण्या धर्माचा वा जातीचा प्रचारक म्हणून नाही फिरत आहेस. पण तू ही पाहिलं असेलच इतक्या दिवसांत, कि कसं तुला काही ठिकाणी धार्मिक चढाओढीला जोडल्या गेलं तर. तेव्हा मात्र तुझ्यासाठी खूप वाईट वाटलं होतं. आमच्या इथे जरा चालतं असं, त्यासाठी मनापासून दिलगिरी व्यक्त करते.
पण एक बोलेल, म्हणजे खरं तर ते महत्त्वाचं बोलायलाच हे पत्राच प्रयोजन.! तू कमालच केलीस, म्हणजे अरे इतके दिवस नाही राहायचं रे कोणाकडे. आता मी मित्र म्हणून सांगतेय, म्हणून वाईट नको वाटून घेऊ जास्त, बरं का? मी फक्त सत्याच दर्शन करून देतेय तुला. आता तूच पाहा ना, जेव्हा तू आला, तेव्हा तुझ्यासाठी किती कष्ट सहन केले प्रत्येकाने. मोठे तर मोठे, पण आबालवृद्धांनी सुद्धा रे.! त्याच काय ना, इतर देशांच नाही माहित, पण आमची माणसं जरा जास्त धार्मिक आहेत आणि त्यामुळे आमच्या ब्रिदवाक्य प्रमाणे ते वागले.
पण कसं आहे ना कोरोना, पाहुण्या माणसाने इतकं ही कोणाकडे राहू नये रे, कि तिथल्या लोकांना आपला वीट येईल. तू आल्यावर तुला प्राथमिकता दिली सर्वांनी, घरकोंडी स्वीकारली, सामाजिक भान ठेवा एरवी सांगितल्या जात सगळीकडे पण तुझ्यामुळे तर सामाजिक अंतर सुद्धा ठेवलं आणि ठेवतोय. म्हणजे अक्षरशः सगळे तुझ्या सेवेत रुजू झाले. तुला काय हवं-नको ते आणि तेच विचारांत आणि कृतींत होत. तोंडाला फडकं काय अन् ते अल्कोहोल-युक्त द्रव काय ! दर १५ मिनिटांनी ते हाताला चोळायचं, घरात ही दूरदूर बसायचं, एकच जण घराबाहेर पडायचं, घरातून काम, घरातून परीक्षा, अजून काय काय! हा, जाणीव झाली खरी, त्या मुक्या प्राण्यांना पिंजऱ्यात कसं वाटत असेल याची.
पण अरे, आर्थिक बाजू खिळखिळी झाली अनेकांची, जीव सुद्धा गेलेत/दिलेत अनेकांनी. ते काय ऑनलाईन बिनलाईन शिक्षण सुरु झालं अशात, तुला काही अंदाज आहे का की, त्यामुळे आमच्या मुलाबाळांना किती नवे रोग अन व्याधी होऊ शकतात.? तुझ्यामुळे ज्यांना इस्पितळात जावं लागलं आणि जे तिथे जाऊन पुन्हा घरी नाही येऊ शकले, त्यांच्या घरच्यांची काय हालत असेल रे? आमचे डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी आदी लोक जीवाचं रान करून अजूनही लढा देतायेत तुला. पण अरे, जनमानसांत आता संयम कमी होऊ लागलाय. काय करतील बिचारे? तुला भूक लागली म्हणून तू जसा या देशातून त्या देशात फिरलास, तस त्या गरीबाच्या भुकेचही घे थोडं लक्षात. आणि हो, खेड्यापाड्यात शहारा इतकी तात्काळ सेवा नाहीये अजूनही. तिकडे आवरता हात लवकर घे बाबा. शेतकरी आधीच हवालदिल होऊन जगतो, त्याला अजून त्रास नको. आम्ही काय रे, युवा आहोत. पाच-दहा ठिकाणी हातपाय हलवून कामधंदे करून घेऊ. परंतु, कित्येक वयस्क झालेल्यांच्या ही नोकऱ्या गेल्या तुझ्यामुळे, सगळा मजूरवर्ग पायदळी तुडवलास. घाबरतात लोकं आता कामावर पुन्हा रुजू व्हायला.
असा कसा रे तू? कोणती अवदसा सुचली तुझ्या मायबापाला आणि तुला फिरतीवर पाठवला. देव जाने.! पण तू जरा समाजदारी दाखव आता आणि परतीच्या प्रवासासाठी गाठोळी बांधायला सुरु कर. हवं तर आजवर जशी मदत केली आम्ही, तशी अजून करू. पण तू आता माघार घे. अरे कोरोना, आम्ही एकदाचे आतंकी हमले, नैसर्गिक आपत्ती, बलात्कार, खून, इ. झेलून घेऊ. आता सवय ही झालीये यांची. पण तुला मात्र आता नाही झेलू शकत. त्यात तू अदृश्य. सांग आता तूच, कसं करायचं आम्ही?
आणि हो, मान्य आहे रे की, माणूस खूप मतलबी जगतो. स्वतःच्या विकासासाठी वाटेल ते करतो. अफवा की काय माहिती, पण तुलाही तर तुझ्या मायबापाने त्यांच्या मतलबासाठी पाठवला होता, असं कानावर पडायचं आधी. म्हणजे पाहा ना, तुला पण नाही सोडला माणसाने. पण आता त्याला बुद्धी आहे आणि तो त्याचा उपयोग करेलच. फक्त आता त्याने समजूतदारीने वागावं, अशी अपेक्षा आहे, आणि कुठेतरी तू पण ही अपेक्षा ठेवून असशील. तुझी आणि या निसर्गदेवाची अपेक्षा नक्की पूर्ण करण्याचा प्रयत्न असेल. खोटं आश्वासन नाहीये बरं. मित्र म्हटलेलं रे तुला, तू पण थोडी मैत्रीसाठी बलिदान दे. जा इथून. यात सर्वांचं भलं आहे.
कळावे, लोभ असावा.
तुझीच,
एक मैत्रीण/
एक लाभार्थी/
एक शरणार्थी/
एक शुभचिंतक
खूपच छान!!! आता तर कारोनाची सवय झाली, पण तुझ लेख वाचून lockdown च्या आठवणी ताज्या झाल्या..
उत्तर द्याहटवाहोय ना, धन्यवाद😊
हटवाIt's amazing . knowledge of words is tremendous. Keep going.👍
उत्तर द्याहटवाThank you so much😊
हटवाखुप छान पत्र लिहल👍
उत्तर द्याहटवातुमचे खूप खूप आभार😊
हटवाखुप छान...
उत्तर द्याहटवाThanks a lot😊
हटवाव्वा, खूप छान
उत्तर द्याहटवाअप्रतीम शब्दसंग्रह👌👌👌 फार सुंदर आणि अतिउत्तम लेखन..!!
आणि हां, कोरोना नक्कीच जाईल ,,,..
जायला हवाच इतक्या मिनता केल्यावर😝 धन्यवाद तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल😊
हटवा�� खूप छान
उत्तर द्याहटवाThanks😊
हटवा👌👌👌👌
उत्तर द्याहटवाDhanywad😊
हटवाअगदी बरोबर पत्र.....अतिशय चांगले.👌👍
उत्तर द्याहटवामनस्वी आभार😊🙏
हटवाKhup Chan didi 😊👌👌....
उत्तर द्याहटवाCorona bddlche advantages n disadvantages अगदी छान ...khup Chan Describe kel,, and I wish that your later words about corona as soon as being true....he will go...😇
Yes dear, thank you so much😊😊
हटवाखुप छान् काव्य रचना केली ताई।
उत्तर द्याहटवाKhup khup dhanyawad😊
हटवाKhup sundar.... Saglyanchya manatlya vicharanna shabd diles tu
उत्तर द्याहटवाधन्यवाद ऋचा😊😊
हटवाखुप भारी ������ १०१%
उत्तर द्याहटवाधन्यवाद😊
हटवाखुप भारी लिहलंय १०१%
उत्तर द्याहटवाखूप खूप आभार😊
हटवाKhup chan mrunali... 👌👌👌 Faar sundar patra ahe.. 👏🏼 Keep it up... 👍😊
उत्तर द्याहटवाThank you so much😊
हटवानेहमी प्रमाणे अप्रतिम असं लिखाण 👏👏❤️
उत्तर द्याहटवामनस्वी आभार तुझे😊
हटवाCorona mule samajavar kasa prakare parinam zala te vegveglya prakare khup simple bhasemadhe mandales. Taschec corna che advantage and disadvantage mandlyabadal dhanyawad.
उत्तर द्याहटवाअगदी बरोबर👍 thank you😊
हटवाछान पत्र लिहिलय लॉकडाउन च्या आठवनी ताज्या झाल्या😄😄
उत्तर द्याहटवाखूप खूप धन्यवाद😊😊
हटवाछान पत्र लिहिलय लॉकडाउन च्या आठवनी ताज्या झाल्या😄😄
उत्तर द्याहटवाKhup khup chan....mrunali.....❤️❤️
उत्तर द्याहटवा✌️✌️
Siso you will definately shine...❤️
Lots of love from @quota_positive_viber....
Thanks dear😊
हटवाKhup chhan.....
उत्तर द्याहटवाAabhar😊
हटवाअप्रतिम 👌
उत्तर द्याहटवाआभार😊
हटवाशब्द संग्रहातून केलेली एक उत्तम रचना आणि भावनांची हृदयस्पर्शी जोड.❤
उत्तर द्याहटवामनापासून धन्यवाद😊
हटवाकोरोनामुळे झालेल्या फायद्याची तसेच नुकसानीची उत्तम मांडणी केली ..खरोखर अप्रतिम
उत्तर द्याहटवाखुप खूप आभार😊
हटवाकोरोनामुळे झालेल्या फायद्याची तसेच नुकसानीची उत्तम मांडणी केली ..खरोखर अप्रतिम
उत्तर द्याहटवाअतिशय सुंदर दीदी👌अप्रतिम वाक्य रचना😍😍
उत्तर द्याहटवाखुप खूप आभार😊
हटवाखुप छा न
उत्तर द्याहटवा