पत्र लेखन- स्पर्धक क्रमांक 20 स्वानंद मराठे

स्पर्धक क्रमांक 20


नाव: स्वानंद नंदकुमार मराठे

इंस्टा आय डी : @kavyabhas_

शहर : रायगड

ईमेल : swanand.marathe410@gmail.com



प्रिय श्रीमहाराज,


          तुम्हास सादर वंदन. पत्र वाचले आपले आणि संतोष झाला. महाराज आणि श्रीरामारायांचंच हे घर आहे. हीच जाणीव कायम मनात आहे.

          महाराज आपल्याच घरी यायची परवानगी का मागता? विनंती का करता?

          जिथे तुम्ही आधीच वास्तव्यास आहात तिथे सर्वांना कायम सांभाळून घेतले जातेच. तुमचे असणेमात्र आम्हास परलोकीचे सूख या मृत्युलोकात अनुभवास आणते.

श्रीराम नामामधे हे घर सतत वास करते. माफ करा महाराज मुद्दाम नामामधे घर वास करते असे लिहीले, घरामधे नाम वास करते असे लिहीले नाही कारण हे घरच तुमचेच आहे. महाराज तुम्हाला अत्यंत प्रिय असणारे अन्नदान करण्याचा प्रयत्न या घरातून कायम होत असतो. आणि तो तसा प्रयत्न कायम यशस्वी व्हावा यासाठी आशिर्वाद द्या.

          मला तुमची ओळख करुन देणार्या माझ्या वडिलांसमान असलेल्या डाॅक्टर काकांच्या हातून ही सेवा रोज होत असते, तसेच त्यांची डाॅक्टर मुलगी सुद्धा खूप सेवा करत असते. त्यांच्यावर तुमचा वरदहस्त कायम रहावा ही तुमच्या चरणी प्रार्थना.


मी स्वतः तुमचा अनुग्रह घेतलेला नाही. परंतु श्रीमत् दासबोधाचे अध्ययन आणि माझे वडिलांप्रमाणे श्रीरामाचे नामस्मरण करत असतो. तुमचे अस्तित्व जसे मला जाणवते तसेच श्री समर्थांचेही अस्तित्व मला आपल्या घरात जाणवते. आपल्या घरात येणारा अतिथी या नामामुळे पवित्र झालेल्या घरातील वातावरण, अन्न अथवा पाणी यामुळे संतुष्ट होतो. आणि तो तसाच संतुष्ट व्हावा ही आपल्या चरणी प्रार्थना.

          यंदाच्या गुरूपौर्णिमेला तुम्हास अत्यंत प्रीय असणारे अन्नदान जरूर केले जाईल, किंबहुना या तुमच्या घराकडून तुम्ही ते करून घ्याल याची खात्री आहे.

          सध्याच्या या महामारीच्या काळात कित्येक लोक आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी जमेल ते करत आहेत. ज्यामध्ये लष्कर, पोलीस, डाॅक्टर, स्वच्छता कामगार, इतर अत्यावश्यक सेवा पुरवणारे, इ. या सर्वांचे आरोग्य उत्तम राहो ही तुमच्या आणि रामाच्या चरणी प्रार्थना... आणि अशी काही सेवा करायची संधी मला मिळाली तर त्या संधीचा माझ्याकडून समाजाला लाभ व्हावा असाही आशिर्वाद द्या.

          आता पत्र येथेच थांबवतो महाराज. माझ्या मनातले तुम्ही सर्व जाणताच. तुम्हीही काळजी घ्या महाराज.


॥ श्रीराम जय राम जय जय राम ॥


🙏🏻🙏🏻🙏🏻 श्रीराम 🙏🏻🙏🏻🙏🏻


आपला,

स्वानंद नंदकुमार मराठे.

श्रीरामांचे घर, पुणे

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट