पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 19- प्रिया तांबडे
स्पर्धक क्रमांक 19
नाव : प्रिया पांडुरंग तांबडे
Insta ID : priyatambde13_27_
City. : Alibag Raigad
Email Id : priyatambde8@gmail.com
प्रिय परमेश्वर 🙏
कसा आहेस परमेश्वरा ?? सगळं काही ठीक आहे न ?? आश्चर्य वाटलं असेल ना तुला पत्र लिहिलेलं पाहून ?? होय , तुलाच लिहिलंय मी पत्र ... खूप भांडायचं...तक्रारी करायच्या आहेत ! आज मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे हवीत ...देशील ना रे ??
सगळ्यांकडून ऐकलंय की तू साऱ्या सृष्टीचा निर्माता आहेस , जस पुरुषांना निर्माण केलस तसच स्त्रियांना ही ... दोन्ही ही तुझीच मुले आहेत ...समान प्रेम करतोस ना ...मीही नाकारत नाही तुझं अस्तित्व.... पण दगडात पाहण्यापेक्षा तुला मी माणसात पाहते ....पण आता तू तिथेही नाही दिसत रे ....सगळीकडे शोधलंय तुला ,पण तू काही भेटला नाहीस म्हणून आज पत्रच लिहतेय .
आम्हां मुलींना तू मुली म्हणून जन्माला घातलस ! काय गुन्हा केला होता आम्हीं ? कोणतं पाप केलं होतं ? की तुझ्या जवळ असताना आम्ही तुला त्रास दिला होता का रे की तू शाप देऊन ह्या पृथ्वीवर मुलगी म्हणून जन्माला घातलस .....आज तुझ्या लेकींवर अन्याय होतोय .. भर बाजारात त्यांची अब्रू लुटली जातेय ...तीच संपूर्ण आयुष्य उध्वस्त केलं जातंय ...कोणासमोर ?? तुझ्या....तुझ्यासमोर ! का नाही तेंव्हा पण प्रगट होऊन त्या नराधमांना शिक्षा देत तू ? हा ! सवय झाली असेल ना तुला तुझ्या लेकींवर अन्याय होत असताना डोळे बंद करून घेण्याची .... पण परमेश्वरा , कान ?? ते कसं बंद करत असशील ?? तो हंबरडा .. तो केविलवाणा आवाज .. नाही का ऐकू जात तुला ??
आज तुझ्या एका लेकीवर अत्याचार .... उद्या दुसऱ्या.... परवा तिसऱ्या.... अस अजून किती जणींचा बळी जाणार आहे देवा ?नाही का तुझ्यात तेवढी शक्ती की तुझ्या लेकींवरचे अन्याय थांबवू शकतोस ?? सगळे मार्ग जेंव्हा बंद होतात तेंव्हा तुझा दरवाजा उघडला जातो .. कधी उघडणार तुझा दरवाजा देवा ?? कधी ?
भगवद्गीतेमध्ये लिहिलंय ना की "जेंव्हा जेंव्हा या धरतीवर पाप वाढेल तेंव्हा तेंव्हा तू जन्म घेऊन वाईटाचा विनाश करशील " ...कधी घेशील जन्म परमेश्वरा ?? अजून किती पाप वाढायचे बाकी आहेत ??
माफ कर मला... माहितीय लहान तोंडी मोठा घास घेतेय पण थांबव ना आता तरी तुझ्या लेकींवरचे अन्याय ...अत्याचार ! थांबव आता तरी ....कळकळीची विनंती करतेय तुला तुझी ही लेक .
तुझीच
एक लेक
छान प्रिया खुप छान
उत्तर द्याहटवाKhup chan 👌
उत्तर द्याहटवाSundar lekhan
उत्तर द्याहटवाखुपच छान
उत्तर द्याहटवाखुपच छान
उत्तर द्याहटवा