स्पर्धक क्रमांक : १७ - आदित्य बाबासाहेब थोरे

 स्पर्धक क्रमांक : १७


नाव - आदित्य बाबासाहेब थोरे


इंस्टा आयडी - adithore76


ईमेल आयडी - adithore76@gmail.com


शहर - सेलू जि. परभणी


ब्लॉग लिंक - aidethinker.blogspot.com






प्रिय, मित्रांनो,


विषय :- मनातल बोलावं वाटलं म्हणून,


        नमस्कार मी लफिंग क्लब, हो अगदी बरोबर तुम्ही जसा विचार करताय तोच मी तुम्हा पाच जणांचा ग्रुप (what's up grp. ) बोलतोय,


      आता तुम्हाला प्रश्न पडला आसेल मी कसकाय आज आसं अचानक पने येऊन तुमच्याशी सवांद साधतोय, छे हो संवाद कसला मी तर तुम्हा कलाकारांचा एकमेव अबोल श्रोता. आता आज मला वाचा फुटली आसचं समजा....


    आज तुम्ही माझा खूप लवकर निरोप घेतला ( बहुधा ऑन लाईन लेक्चर मध्ये रेवती बाई रागावून बोलल्याचा चांगलाच फरक पडलेला दिसतोय) अासो, त्यामुळेच न राहवून तुम्हाला बोलावं वाटलं.


     तर आज मी तुम्हा सगळ्यांना मला ताज तवान ठेवत, पोट दुखे पर्यंत हसायला लावलं या बद्दल तुमचं धन्यवाद करायला आलोय.


   तस पाहिलं तर मी तुम्हा सगळ्यांना फार पूर्वी पासून ओळखतो, तुम्ही एमएससी च्या पण ग्रुप मध्ये होतात न, हा तो माझा चुलत भाऊ, तुम्ही कुणी तिकड फार काही बोलत नव्हत म्हणे,माझा भाऊ मला सांगत होता, ती स्नेहा तर एकदम चिडीचूप आसते आणि आदित्य, केशव, योगिता थोडसं काहीतरी हो- नाही बोलायचे. पण ती गृष्मा मात्र फार उत्तर द्यायची ह... पण या ग्रुप मध्ये सगळच उलट आहे हो...!

   

    " ती स्नेहा किती बडबड करते, आणि ग्रिष्मा मात्र शांत आसते. "


     ते काहीही असो तुम्ही फक्त पाच जण असून रोज काहींना काही बोलणं चालूच ठेवता या गोष्टीचा मला फार आनंद वाटतो. आहो मी प्रेक्षक म्हणून या ठिकाणी आसतो माझी बाकी काय अपेक्षा आसणार, फक्त संवाद. बाकी अजून भरपूर ग्रुप मध्ये मी राहून आलो. " बॅच 4 " मध्ये पण होतो मी, अगदी माणसं असून संवादाचा वाळवंट साचलेला दिसतोय हो तिथं. पण काही नाही हो खर सांगायचं तर तुमच्या सारखा ग्रुप मी पहिलाच नाही, तुम्ही किती हसवता मला याची कल्पना तुम्हाला नसेल ही, आणि अजून महत्वाचं म्हणजे तुमच्या मुळे मी तर खूप काही शिकलोय पहा. तुम्हा मुलांनी तुमची मतं , आवडीनिवडी , एकमेकांबद्दल वाटणारा जिव्हाळा , मैत्री अश्या अनेक गोष्टी या ठिकाणी मन मोकळे पणाने व्यक्त केले आणि तुमच्या मुळे मी थोडी फार रसायनशास्त्र ही शिकायला ह.., ते तुम्ही टाकता ना, दिसतंय का , आवाज येतोय का, ते काय काढलाय , आज शिकवलेली स्क्रीन शॉट पाठवा (मी तर माझ्या मुलांना ही तुमच्याच स्क्रीन शॉट च्या मदतीनं शिकवतो ).


     तर कधी मला update ही खूप मिळतात तुमच्या मुळे, कंगना च घर पाडल, चीन भारत गोळीबार सुरू झालाय, अाहो परवाच्या मॅच ला तर तुम्ही कहरच केला अख्या मॅच ची कॉमेन्ट्री इथंच सुरू केली, वा.... शेवटी मी प्रेक्षक हो, मला याचाच आधार.


  एक गोष्ट मात्र नक्की बोलेल मी,तुम्ही व्यक्त व्हायला कधी नाही चुकलात, कधी चंद्रा वरच प्रेम तर कधी प्राण्यांवर वर असलेला जीव, तुम्ही मनमुराद पने व्यक्त करून टाकला. 

  

       ऑन लाईन लेक्चर मध्ये कुणी दिसल नाही,की लगेच इथे मेसेज पडतो, " हा/ही नव्हत का आज लेक्चर ला ", कधी कुणाचं नाव घेतल्यावर त्याने होकार दिला नाही,' ये कुठंय तू मॅडम नी नाव घेतलं तुझ ', कुणाला प्रश्न विचारला,तर क्षणात उत्तर तुम्ही त्याच्या समोर हजर करता.(म्हणजे मला तर आसं वाटत कुठल्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे असतील तर तुम्ही Google च्या पहिले इथेच टाकत असताल) कुणी फार राग राग, चीड चीड करत असेल तर तुम्ही सगळे मिळून त्याची समजूत काढता.हे पाहून मला फार आनंद होतो. गर्व वाटतो मला मी तुमचा श्रोता असलेल्याचा.


      तस तुम्ही एकदा गृश्मा ला रात्री बोलली नाही म्हणून फार परेशान केलं होत ह..., ध्यानात आहे ह माझ्या 'आदित्य आणि योगिता' अजून. आणि तितक्यात स्नेहा लेफ्ट झाली, केशव पण म्हणतोय मीपण लेफ्ट होईल म्हणून . आरे.. केव्हढा घाबरलो होतो मी तेंव्हा, काय सांगू. बरं झालं तुम्ही व्हिडिओ कॉल करून जोराचे हसलात. 


    ह अजून एक आठवलं म्हणून सांगतो , ते " शंका आणि समाधान " या नावाने निर्मित झालेला मी, अखेर शंका आणि समाधान यांच्या चक्रव्यूहात अडकून न राहता तुम्ही माज नाव बदललं आणि मला या हास्य जत्रेत सामील केले त्या बद्दल मी तुमचा ऋणी आहे.


        


   " बाकी हसत रहा, मज्जेत रहा, मैत्री forever.... आासो..."


" बरं चला येतो मी रात्र खूप होत आलिये.

   आणि हो आज कुणी मला गुड नाईट नाही केलं ह......"





                                                                         तुमचाच,

                                                                  लाफिंग क्लब.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट