पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 6 -कीर्ती पाटील

 नामशेष होण्यापूर्वीचं पत्र.... 

स्पर्धक क्रमांक 6

स्पर्धकाचे नाव:- कीर्ती दयाराम पाटील

Insta id:- @_lakshmi_18

स्पर्धकाचे शहर:- मुंबई

Email id :- 2018.kirti.patil@ves.ac.in



२२ मार्च २०२०, सायंकाळचे ५ वाजले होते. अचानक मला कसलातरी आवाज येऊ लागला. मी आपला माझ्या कामात मग्न होतो. तो आवाज हळुहळु वाढतच गेला. मला प्रथम वाटलं हा आवाज आहे माणसाने केलेल्या विध्वंसाचा, त्याच्या चीड अन् किंकाळ्यांचा. परंतु मग मला कळलं, हा आवाज आहे एकोप्याचा, सोबतीने माणुसकीने वंदन करणाऱ्या माणसाचा...! कित्येक वर्षांनी आज पहिल्यांदा मी या माणसाला माणूस म्हणून वागताना पाहिलं.


हजारो वर्षांपूर्वी माझी निर्मिती झाली. हळुहळु प्राण्यांची, झाडांची निर्मिती झाली. युगांमागून युगं गेली. झाडं, फुलं, प्राणी, पक्षी सर्वजण माझे नियम पाळत होते. परंतु एका प्राण्याला स्वतःला सुधारण्याची इच्छा होती. म्हणूनच तो माझा आवडतादेखील होता. त्याने प्रगती करून खूप मोठं व्हावं अशी माझीही इच्छा होती. चाकाचा शोध, आगीचा शोध, ते चक्क संगणक आणि माकड, आदिमानवापासून ते थेट टाय अन् सूटमधल्या माणसापर्यंत तो पोहोचला. सुरूवातीला मला त्याचं कौतुक वाटंत होतं, पण नंतर नंतर प्रगती करण्याच्या नादात तो माझ्या नियमांना विसरलाच, परंतु माझ्या नियमांमध्या ढवळाढवळही करू लागला. दिवसेंदिवस त्याची ही मनमानी वाढतच चालली होती.


काय काय केलं नव्हतं त्यानं. जागा पुरत नाही तर जंगलं तोडली. प्राण्यांना बेघर केलं. मोठमोठे कारखाने बांधले अन् त्यातून येणाऱ्या धूराने सर्वांना गुदमरून टाकलं. दूषित पाण्याने नद्यांना काळवंडून टाकलं. हवा, पाणी, झाडं, पक्षी, प्राणी या सर्वांच्या जगण्याचा नाश करून हा स्वार्थी माणूस सूटबूट घालून एसी ची हवा खातोय. ही कसली प्रगती? आणि कोणाच्या जीवावर? माझ्याच?


म्हणून म्हटलं, आता पुरे झालं. या माणसाला अद्दल घडवायला पाहिजे. खूप सहन केली याची हुकूमशाही. सुंदर, रम्य अशा माझी ही काय भीषण अवस्था करून ठेवलीये ह्यानं. आता माणसाला शरण आणण्याशिवाय पर्याय नाही. आणि झालंही तसंच. एका अदृश्य छोट्याशा विषाणूने या माणसाला माझ्या पायाशी आणून उभं केलं. कित्येक वर्षांनी आज मी शांतता अनुभवली, रस्त्यांवर माणसांपेक्षाही कुत्र्यांचा वावर जास्त होता, हाॅर्नच्या आवाजापेक्षा पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता, कित्येक वर्षांनी माझी झाडं मोकळा श्वास घेत होती. १५ दिवसांसाठी का होईना, मी पुन्हा राजा झालो होतो अन् पुन्हा माझी सत्ता चालणार होती. आज ह्या छोट्याश्या विषाणूने माणसाला माणुसकी, परोपकार अन् कृतज्ञतेची आणि मला माझ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली. त्याचे आभार मानावे तितके कमीच.


मानवजातीचा विनाश करण्यासाठी नव्हे तर त्याला मानवतेची जाणीव करून देण्यासाठी या विषाणूचा जन्म झाला आहे असं मी म्हणेन. मी केवळ माणसाला योग्य ती समज यावी याची वाट बघतोय. शेवटी कसाही वागला तरी तो माझाच एक अंश आहे. काहीही झालं तरी मी त्याच्यासारखा वागू शकणार नाही. असो, इतर जीवांच्या अस्तित्वाची काळजी केल्यास आयुष्य नक्कीच चांगलं होईल, सर्वांचच. हीच संधी आहे. आता तरी सुधार...


तुझा,

निसर्ग.


- लक्ष्मी♥

टिप्पण्या

  1. निसर्गाचे महत्त्व पटवून देणारे विचार. खूपच सुंदर👍👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. अगदी खरं आहे...खूप छान आणि सोप्प्या प्रकारे मांडल आहे🙌👏👍

    उत्तर द्याहटवा
  3. खुपच छान आणि मनाला स्पर्शून जाणारं आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान विचार मांडले आहेत.प्रत्येक नागरीकाने याचा विचार करून त्या अनुषंगाने पावले उचलली पाहिजेत.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट