पत्रलेखन स्पर्धक क्रमांक -०३ रूपाली कोराळे

 स्पर्धेसाठी 

विषय: पत्रलेखन

स्पर्धक क्रमांक -०३

नाव: रुपाली चंद्रकांत कोराळे

Insta I'd: r.u.p.a.l.i.22

City: Nashik

E-mail: rupalikorale2000@gmail.com



प्रिय नागरिकांनो,


           नमस्कार, ओळखल का मला नसेल ओळखल तर ऐका,मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसतो शहरात, गावात,चौकात प्रत्येक ठिकाणी माझे अस्तित्व आहे.

आज मला थोड बोलायचं तुमच्याशी......

                   अरे आपला भारत देश महासत्ता होण्याच्या मार्गावर आहे. पण या देशात हे चालय तरी काय? या कोरोनाच्या काळात आम्ही आमचा जीव धोक्यात घालून दिवसरात्र राबतो. प्रत्येक ठिकाणची साफ - सफाई, गटारे - नाले, रस्ते साफ करतो आणि आपल्यातील काही लोक अजूनही स्वच्छतेचे महत्व समजले नाहीये. सार्वजनिक शौचालयात जाऊन पान,गुटखा खाऊन तेथेच पिचकाऱ्या मारतात. रेल्वे स्थानक, बस स्टॉप सगळीकडे हीच अवस्था आम्ही दिवसातून तीन - तीन वेळा तेथे जाऊन सफाई करतो. तुम्ही घरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावता ना? मग का बिस्किटाचे कागद, निकामी वस्तू कचराकुंडी जवळ असतानाही रस्त्यावर फेकता. घरात शौचालय स्वच्छ ठेवता ना मग तसेच सार्वजनिक शौचालयेही स्वच्छ ठेवत जा.

       आता तुम्ही म्हणाल काम आहे ते तुमचे, हो काम आहे ते शेवटी पोटचा प्रश्न येतो. पण कधी विचार केला का ते काम करून झाल्यावर दोन घास तरी नीट पोटात जात असतील का? दोन दोन दिवस घरी जात नाही, जर आम्हाला काही झाले तर पोरांकडे कोण बघणार? हा प्रश्न कधी येत नाही का तुमच्या मनात. स्वच्छ भारत अभियानाचे नारे देत फिरणारे तुम्हीच ना! ते फक्त दाखवण्यासाठी की सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी? ज्यावेळी तीन महिने तुम्ही घरात बसून होता तेव्हा आम्ही रात्र दिवस राबत होतो. देश तर सर्वांचा आहे ना,मग तो सर्वांनी मिळून साफ ठेवायला हवा ना.

        अरे गाडगेबाबांनी स्वच्छतेचा संदेश दिला त्यांना संत मानतो आपण मग आम्हाला अशी अपमानास्पद वागणूक का? कोणाकडे पाणी मागितले तर तेही तुम्ही देत नाही.

  यानंतर तरी तुम्ही आम्हाला समजून घ्याल हीच आशा करतो आणि थांबतो.

                                           तुमचाच,

                                    सफाई कर्मचारी


टिप्पण्या

  1. ,सर्व सफाई कर्मचार्यांचे धन्यवाद कारण तुमच्या कष्टामुळे सुधा कुठेतरी आपला देश प्रगतीपथावर मार्गक्रमण करत आहे आणि धन्यवाद रुपाली तुझ्या लेखनामुळे तू दूरपर्यंत त्यांच्या भावना ,विचार व सध्याची परिस्थिती पोहचल्या बदल . Good work , keep it up dear

    उत्तर द्याहटवा
  2. Outstanding such a brilliant writing dear, your knowledge is too good, 👍✌️🤗

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान विषय निवडला आहे.
    खर तर आपण सर्वांनी याचा विचार करायला हवा

    उत्तर द्याहटवा
  4. स्वच्छतेचे महत्त्व खूप चांगल्या प्रकारे सांगितले आहे

    उत्तर द्याहटवा
  5. फारच छान ....आणि माझी आई सुद्धा सफाई कर्मचारी....मला माझ्या आईचा अभिमान वाटतो. उत्तम लिहिता...

    उत्तर द्याहटवा
  6. असा विचार सगळ्यांनी केला पाहिजे खरचं खूप छान लेख लिहला तुम्ही

    उत्तर द्याहटवा
  7. सगळ्यासाठी काही ना काही लिहले जाते पण सफाई कामगारांसाठी कोणी कधी काही बोलत नाही किवा काही लिहत नाही तुम्ही त्यांच्या साठी खरच खूप छान लिहिले

    उत्तर द्याहटवा
  8. खूप छान विषय निवडला तुम्ही

    उत्तर द्याहटवा
  9. अगदी भारी लिहला आहे तुम्ही
    तुम्ही खूप पुढे जाल तुम्ही येचातच
    करियर करा।

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट