पत्र लेखन स्पर्धक क्रमांक 9 -रेश्मा बोडके

 

स्पर्धक क्रमांक 9

कु.रेशमा निलेश बोडके

घाटकोपर, मुंबई

Email...reshmbodke@gamil.com

Insta...reshambodke




प्रिय पुस्तक,

तुला काय बोलू मी सखा,सोबती कि पाठीराखा.माझ्या आयुष्याचे पहिले पान आणि शेवटचे पानही ही तुच आहे.पुस्तकासारखा मित्र नाही हे अगदी बरोबर आहे.तुझं माझ्या आयुष्यात येण्याने आयुष्याला एक वेगळीच कलटाणी मिळाली.एक पुस्तक म्हणून नाही तर एक दोस्त म्हणून जगते,तुझ्यासोबत.तुझ्या वाचनवेडी या शब्दाने पुस्तकवेडी कधी बनले कळलेच नाही.माझ्या आयुष्याचा मार्गदर्शक आहेस.तु निर्जीव असूनही बोलका आहेस.नेहमी माझ्याशी बोलत असतो.एक दिवस जरी बोलला नाही तरी काही तरी हरवलं असं वाटतं.

       आयुष्यात एक तरी पुस्तक असं असतं जे जीव कि प्राण असतं.पुस्तके वाचावी,आपण त्यांना ओळखावं.त्यांना आपलसं करावं.थोड त्यांच्याशी एकांतात बोलावं,थोडं रुसावं,थोडं हसावं, थोडी शब्दांची ओळख व्हावी.नकळत पुस्तके आपणच लिहावी.दोस्ता तुला सांगू,लोक मला पुस्तकवेडी बोलतात.कधी कधी सल्लेही देतात,जास्त पुस्तके वाचली कि माणूस वेडा होतो, तुझ्यापासून तोडण्याचा मार्ग मात्र असफल होतो.तुझं आणि माझं नातं दोस्ता पलिकडचं.पुस्तके म्हणजे प्राण,ज्ञानाचा गाभा भरलेला,मैत्रीच्या धाग्याने लपलेला.एकांतामधलं औषध,आयुष्याचा मार्गदर्शक,वाचकांचा आधार,ग्रंथांचे भांडार,पुस्तकांची लायब्ररी.

            मनाच्या गाभाऱ्यात तुझ्यासारख्या पुस्तकांची सतत रेलचेल असावी.मी पुस्तकातून शिकतो असं न म्हणता आम्ही पुस्तकांना शिकवतो.त्याच्या अनुभवांतुन संस्कार,विचारवंत,ज्ञानाचा खजिना असणारे वाचक निर्माण होत असतात.वाचनालयात गेल्यावर प्रत्येक वाचकाला वाटतं ही पुस्तके सर्व माझी आहेत.ज्ञानाच्या परिक्षेत तुझं माझा सोबती असतो.अनुभव मांडावे तुझे किती तरी ते कमीच आहे.वाचकांना पाठिंबा देणारा,कथा आणि कादंबरी मांडणाऱ्या,जगाची ओळख तुझ्याच पुस्तकातून होते.अनुभवाचे धडे आणि आयुष्याचे मार्ग तुझ्याकडून शिकले

तुझीच,

वाचक

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट