पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 7- अक्षता गडकरी

 स्पर्धेसाठी पत्र 

स्पर्धक क्रमांक -०७ 

नाव - अक्षता सुनिल गडकरी 

पत्ता - कोल्हापूर 

insta id - @suvarnkanya1405

E-mail -gadkariakshata@gmail.com



आदरणीय, 

नागेश दादा, 



       पत्र लिहिण्यास कारण की काही गोष्टी अशा आहेत ज्या मी तुम्हांला सांगू शकत नाही म्हणून या छोट्याश्या पत्रातून सांगत आहे .कोण कुठले काय करता काहीच माहित नव्हतं,  परंतु सोशल मीडिया प्रसारणात शब्दांशी नातं जोडलेली फार दुर्मिळच माणसं मी माझ्या आयुष्यात पाहिली.. महाराष्ट्र कवी मंचाच्या माध्यमातून तुमची आणि माझी ओळख झाली त्यामुळे मंचाची मी जन्मभर ऋणी असेन. आणि ही ओळख बहीण -भावाच्या नात्यात कधी गुंफून गेली काही कळलेच नाही . ना कोणता गर्व, ना कोणता अहंकार, तुमच्या साध्या सोप्या आणि निरागस विचारसरणीने माझ्या मनात घर केल.. मला सक्खे आणि चुलत मिळून १५ भाऊ आहेत पण त्यांच्यापेक्षा दादा तुम्ही खूप वेगळे आहात. दूर आहात पण अगदी सख्या बहिणीसारखी माझी काळजी घेत असता. छोटया छोटया गोष्टीतून आनंद देत असता. अगदी लहान मुलाला जस चॉकलेट देऊन आनंद देतात. अगदी तसेच तुम्ही मला चॉकलेट देऊन आनंद देत असता.. 

           आज सकाळी तुम्ही स्पर्धेसाठी लिहलेलं पत्र अनिकेत सरांनी मला पाठवलं.वाचतांना अगदी मन भरून आलं. नकळतपणे माझे डोळेही पाणावले. माझ्याबद्दल तुमच्या मनातील भावना वाचल्या अनुभवल्या ही. रक्ताचं नातं नाही परंतु रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठा आनंद मला तुम्ही दिला. तुमची माझ्याबद्दलची आत्मीयता पाहून मी भारावून गेले. आणि समजलं जगात फक्त वाईटच लोक नसतात चांगली लोक ही असतात हे तुमच्या मुळे खऱ्या अर्थाने समजलं.

      माझ्या लिखणातील प्रत्येक चुका सांगून सुधारणा सांगून मार्गदर्शन करत असता. उत्तम भाऊ आणि मार्गदर्शक या दोन्ही रूपात तुम्ही मला भेटला आहात.तुमची अशीच साथ मला आयुष्यभर लाभो.. खूप प्रगती करा खूप मोठे व्हा तुमच्या कष्टाला यश मिळो तुमच्या प्रत्येक सुखदुःखात ही बहीण सावलीसारखी तुमच्या सोबत असेल. 

शेवटी माझी एकच इच्छा त्या देवाकडे असेल प्रत्येक जन्मात तुम्ही मला भाऊ म्हणून मिळावे.. आणि माझ्या या भावाला दीर्घायुष्य लाभो.. 



तुमचीच बहीण, 

अक्षता. 




टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट