पत्रलेखन स्पर्धक क्रमांक 5- नागेश तायडे

 स्पर्धेसाठी..

स्पर्धक क्रमांक -05

नाव : नागेश तायडे

गाव : दौंड, पुणे.

मो. नं. : ९०२८७८४९९७.

इंस्टा आय डी : nagesh.tayade7

मेल : nageshtayade@gmail.com



प्रिय,

अक्षता गडकरी.



          पत्रास कारण की, खुप काही गोष्टी आहेत जे मी तुला सांगू शकलो नाही तेच या पत्राद्वारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या जीवनातला अविभाज्य घटक म्हणून तू माझ्या जीवनात एक लहान बहिणी या नात्यानं पाऊल ठेवलं. खर तर माझे नशीबच म्हणावं की, माझे काही पुण्य जे तुझ्या रूपाने लहान बहिणी मिळाली आहे.

           आपली भेट तशी महाराष्ट्र कवी मंच मधूनच जुळली. त्यासाठी मी मंच परिवाराचा ऋणी आहेतच. तसेच, तुझ्या बद्दल मला खूपच अभिमान वाटतो. वयाने खुप लहान पण कर्तुत्वाने मात्र तुझे स्थान आभाळ एवढे म्हणालो तर काही वावग नाही.

            वयाच्या १० व्या वर्षी आईची माया देवाने हिरावून घेतले., पण कदाचित देवालाही आईची माया हवी हवीशी वाटत असावी, म्हणूनच देवाने तू वयाच्या १० वर्षीची असताना आईला बोलावून घेतले. पण तू हार ना मानता सर्व दुःख मनात ठेवून, सर्व कुटुंबाला मायेसारखं प्रेम देत राहिलीस. खर सांगायचं झालं तर आई कधी तुझ्यापासून दुर गेलीच नाही ती आज ही तुझ्या बरोबरच प्रत्येक क्षणात सोबत असते. 

तुझे हसली की, ती ही हसते.

तू रडलीस की ती ही रडते. आणि तुला सावरण्याचा प्रयत्न करते.

तुझ्या प्रत्येक सुख दुःखात तुझ्या बरोबर असते आणि राहणार.

              आज तू तुझ्या लेखणीची ताकत सर्वच जणांना दाखवून दिले आहे. एवढ्या कमी वयामध्ये तुझे विचार सर्वांसमोर लेखणीतून मांडलेस,आणि सर्वांनाची मने जिंकून घेतली आहेस.

              तुझ्याबद्दल जेव्हढे सांगावे तेवढे कमीच आहे, पण शेवटी देवाला एकच म्हणावं वाटते, या आयुष्यात बहिणीची माया मिळेल की नाही माहीतच नव्हते, पण तूला माझ्या जीवनात पाठवून मला लहान बहिणीचे प्रेम दिले आहे. त्याबद्दल देवाचे आभारच मानतो.

            

खूष राहा...! लिहीत राहा..!

स्वप्नांच्या वाटेवर, चालत रहा..!

              


तुझा भाऊ,


नागेश तायडे




टिप्पण्या

  1. खूप छान दादा पत्र.अक्षता ताईचा थोडक्यात सर्वांना परिचय करून देणारे...अप्रतिम नातं...gbu both👌✍️🙏

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट