पत्र लेखन स्पर्धक क्रमांक -18 साक्षी तायडे
स्पर्धक क्रमांक 18
नाव - साक्षी रवींद्र तायडे.
Insta id - taydes307
Email id - tayades307@gmail. com
City - amravati (दर्यापूर)
कोरोनाचे पत्र
नमस्कार!
काय मग मंडळी, ओळखलंत का मला? मी तोच जो सद्या तुमच्या जिवावर टिपून बसलेला आहे. मी तोच ज्याला घाबरून तुम्ही लोकांना हात मिळवायचं सोडून रामराम करत आहात. मी तोच जो चीनमधून पसरत पसरत तुमच्या देशाची वेस ओलांडून आलो आहे. आता ओळखलंत ना?
खरं तर धमकी द्यायलाच आलो आहे. कृपा करून दूर राहा माझ्यापासून. जर माझ्याशी जवळीक करायला आला तर स्वतःचा जीव मला अर्पण करावं लागेल. तसं बघावं तर टेलिकॉम कंपन्या, रवळवे स्थानक,न्युज चॅनेल्स सर्वच जण तुम्हाला माझ्यापासून दूर राहण्यास सुचवत आहे. पण त्यातून जरी तावडीत सापडलात तर मात्र काही खेर नाही. आणि मी काही तुमची शेवटची इच्छा वैगेरे पूर्ण करणार नाही हो.. त्यामुळे जराशी सावधानता बाळगाच.
तसं स्वतःच कौतुक किंवा मोठेपणा सांगावा म्हणून नाही, पण माझी दहशत एक दहशतवाद्याला देखील लाजवेल इतकी भयंकर आहे बरं का. लगेच आपली entry झाली काय अन शाळा, कॉलेज सगळं बंद. मोठमोठ्या कंपन्यांनी देखील मला घाबरून कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली आहे.
व्वा! काय दहशत आहे आपली. पण एक गोष्ट कळत नाही आहे. ते तुमच्या सॅनिक ना पोलीस लोकांना काय माहीत नाही का की मी इथे आलोय ते? सगळ्यांना सुट्ट्या दिल्या आहेत. घाबरून घरी बसले आहेत सर्वजण. पण हे मात्र बिनधास्त आपलं काम करत आहेत. चेहऱ्यावर मास्क वैगेरे तर दिसतो म्हणजे कल्पना तर असावी माझी. पण माहीत असूनही सरळ सरळ न घाबरत उभे राहिलेत आपले. काय आर्यन मॅन आहेत की काय? या आधी swain flue नावाचे माझे पूर्वज देखील इथे येऊन गेले होते. त्यांनी सुद्धा मला सांगितलं होतं. की हे ह्यांचे पोलीस ना सॅनिक कुठल्या मातीचे बनले आहेत काय माहीत. हे तर बिनधास्त उभे राहतात न घाबरता.
खरं तर मी फार क्रूर आहे. ज्या भूमीत जन्माला आलो तिथेच 3000 लोकांचे बळी घेतले मी. पण आज स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उभ्या असलेल्या ह्या सर्व राष्ट्रहितचिंतकांना पाहून खरंच काळीज एकदम मायेन भरून आलं. तुमच्यावर लक्ष ठेवून असलेल्या अश्या या लीडर पट्टांन मुळेच आज तुमचा देश सुरक्षित आहे. माझा क्रूर पण तर संपूर्ण जगाने पहिला आहे पण आता माझं प्रेम देखील ह्या तुमच्या राष्ट्रहितचिंतकापर्यंत पोहचवा.
" सुरक्षित राहा. सर्वांची काळजी करत असताना स्वतःची देखील काळजी ह्या" म्हणून माझा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा.
-आपला घातकी,
कोरोना.
# Sakshi Tayade
Super 👍
उत्तर द्याहटवाNice
हटवाNice
उत्तर द्याहटवा