स्पर्धक क्रमांक : १५ - संचिता नितीन गड्डमवार.

स्पर्धक क्रमांक :१५


नाव- संचिता नितीन गड्डमवार

Insta id- @kavyanchita

शहर- चंद्रपूर (विदर्भ)

Email id- sanchitagaddamwar@gmail.com


प्रिय 'मी'


      पत्र लिहिण्याचे कारण हेच की कसे ही वागले तरी लोकांचे नकारात्मक बोलणे ऐकावे लागतात.त्या बोलण्यांना समोरे जाऊन थकले मी;मग म्हटलं तुझ्यापेक्षा चांगलं कोण समजून घेईल!


     आज खुप कठीण झालयं सगळं.मनात वादळ आलंय विचारांचं.नेमका कुठला विचार जिव्हारी जास्त बोचतोय ते ही उमजेना.कुणी मन हलकं करायला ही नाही,आणि एखादं भेटलच कुणी ऐकून घेणारं तर शब्दच लपून बसतात मनात.मन इतकं पोळून गेलयं भावनांच्या ज्वाळेत की लेखणी ही कागदावर शब्द उतरवायला घाबरत चालली आहे.मनातलं मनात ठेवून ठेवून गुंता झालायं सगळा भावनांचा.


असो..

चांगलंच आहे हे ही,निदान पोळलेल्या जखमांवर फुंकर घालण्यात आणि भावनांचा गुंता सोडवण्यात तरी मन गुंतून राहतं,गरज वाटत नाही कुणाच्या सोबतीची आणि वाटलीच कधी गरज तर याच निमित्ताने तुझी आठवण येते.

शेवटी माझी प्रिय मैत्रीण 'मी' आहेच मला समजून घ्यायला....!!

                            

                           तुझीच प्रिय मैत्रीण

                                संचिता

टिप्पण्या

  1. Khup sunder . Mnatil bhawnana khupch chan pdhtine rekhatl tumhi ya patrat . Khupch sunder asa ptr lihil ahe ha tumhi . Waaahhhhhhhh........🥺Man bharun yete .

    उत्तर द्याहटवा
  2. खुप सुंदर.... मुलीच्या मनातलं ओडखल ❤️😍😊

    उत्तर द्याहटवा
  3. कुठे ना कुठे असं जाणवलं जणू प्रत्येक व्यक्तीची व्यथा यापेक्षा काही वेगळी नसावी..निदान माझी तरी नाही..
    खूप छान होती मी आणि मी च

    उत्तर द्याहटवा
  4. Realy very nice. You are word are absolutely right. Keep it up beta. You are doing great job. I appreciate you

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट