पत्र लेखन स्पर्धक क्रमांक 10 -रुपाली जाधव

स्पर्धक क्रमांक -१०

नाव - रुपाली निलेश जाधव 

इंस्टा आयडी - @jadhav.rupalisara92

ईमेल आयडी - jadhav.rupalisara92@gmail.com

शहर - मुंबई



प्रिय....

 सखी तुला सखी म्हणू की.... अर्धांगिनी?... खरतर या पलीकडे जर कोणता शब्द तुला शोभणारा असेल तर तो म्हणजे माझा "श्वास"! 


तुझ्या काजळाच्या काठावर,  

माझा हुंदक्याचा उंबरठा 

तुझं मुक्यात अडलं पाऊल, 

मी शब्दात वाहिली उत्कंठा.. !


तस तुझ्या साठी लिहिलेलं माझं हे पाहिलं पत्र. इतर वेळी मी तुझ्या डोळ्यात गुंतून बोलणारा, तुझ्याशी आज असा पत्रातून बोलतोय कारण ही अगदी तसच आहे, आज नाराज आहेस तू माझ्यावर! आणि तुझा हा अल्लड रुसवा मोडण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न.  

अशी बरीच पाने तुझ्या साठी लिहून ठेवलेत..! मिटून बसलेत ती मिठीत शब्दांच्या अक्षरा अक्षरात मन कोरून ठेवलंय ग मी…मनातल्या असंख्य किंकाळ्या, आर्जवे नी स्वप्ने, किचित मृगजळी सुख ही! खरं तर मला त्यांची शिफारस करण्यात फारसा रस नाही! मोठेपणाचा आव असाही मला कधी जमलाच नाही. म्हणूनच की काय मी कधीच तुझ्या समोर मांडलं नाही. पण हे पान आणि पान माझं आयुष्य बनलंय! कसं सांगू तुला वेडे प्रत्येकात ते तुझ्यातच बुडलय. तू माझ्या स्वप्नात, मनात, समोर अवती भवती अगदी श्वासात होतीस, आहेस आणि निरंतर असशील ही.


मी अगदी बेभान वाऱ्या सारखा तुझा पाठला करत वेड्यासारखं तुला पाहत असायचो, तुला अनुभवायचो, तुझ्याशी बोलू पाहायचो. कित्येक प्रयत्न करून देखील जितकं तुझ्या जवळ आलो तरीही तितकीच तू अनोळखी वाटायचीस!


तुझं माझ्या आयुष्यातलं अस्तित्व हे जणू स्वप्नच किंवा रहस्यच हे मी कधीचच स्वीकारलं होतं. कारण जितकं मी तुला समजलो तश्याच तुझ्या अदाही बदलत जातायंत. इतका तुझ्यात का गुंतलो? या तुझ्या प्रश्नाला साजेसं माझ्या कडे उत्तर नाही, किंबहुना मी अगदी त्याच शोधात आहे म्हण. तुझं माझ्या आयुष्यात येणं हा सुखद अपघात मानतो मी. एक लाट जोवर त्या फकीर वाळूला स्पर्शत नाही तोवर तो एकला मुका पेटलेला असतो बघ, त्याला माहीतच नसतं गं की त्याच्या रोहिणीला सार्थ अर्थ देणारं कोणी तरी नितळ मनाच आहे. जेव्हा ती लाट येऊन त्याला भिडते ना त्यावेळी त्याच्या काळजात खोलवर एक मऊसर तरंग दरवळू लागतो त्याला क्षण भर कळत नसत की हे कसलं आंदण आहे? तो डोळे बंद करून तिच्यात मिसळून सरकत असतो पुढे पुढे अलवार अलवार, लहरत, तरंगत, त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध तसचं अगदी तुझं माझं आहे. किती सहजच स्वीकारलस तू मला.  मी अगदी त्याच वाळू सारखा आहे ग तुझ्या अस्तित्वाच्या स्पर्शाने माझं जगणंच बदलून टाकलेस. तुझे हर एक बारकावे जगण्यास  नवे रंग देऊन जायचे.  एक तूच खरी होतीस माझ्या सोबत जिने माझ्या मर्मावर बोट ठेवलं होतं.  अलगद तुझं माझ्या आयुष्यात येऊन माझं प्रतिबिंबच बनली होतीस तू.  मी कसा ही असो कुठे ही असो तुझी साथ तू प्रामाणिकपणे दिलीस.  का कुणास ठाऊक मी ही तसाच गुंतत गेलो तुझ्यात.  तुझ्याशिवाय आयुष्य जगणं हे अशक्य झालं होतं.  तस तुला प्रत्येक ओळीत प्रत्येक शब्दात कोरत ठेवायचं जणू व्यसनच जडलं मला. 


तुझ्या नादात मी वेडा झालोय असं लोकं जेव्हा मला म्हणायचे ना "खूप बाप वाटायचं बघ!".  कधीकधी तर ते नुसतं तुझ्या बद्दल कुतूहलाने, आश्चर्याने, ऐकत राहायचे माझ्याकडून.  समाजानेही आपल्या दोघातलं स्टेटस स्वीकारलं होतं कारण त्यांना कधीचच कळून चुकलेलं होतं, मी तुझ्याच आणि केवळं तुझ्याचसाठी कमिटेड आहे. दिवस सरत गेले ऋतू ही बदलत गेले. पाय रोवलेले क्षण ही अगदी दिवसेंदिवस अत्तरत होतेच. मी फारसं तुला काही चांगलं देऊ शकलो नाही ही खंत राहून राहून मनाला छळत असते.जितकं तुझ्या साठी मी केलं त्यात मन नाही भरायचं. सतत काहीतरी नवीन तुझ्यासाठी करावं, तुझं सौंदर्य, मान सन्मान , आदर, प्रेम नेहमी कायम राहावं म्हणून माझी सतत धावपळ असायची.  तुझं आभाळ भरून असलेल्या प्रेमापुठे मी कुठेतरी कमी पडतोय असच सतत वाटायचं.  तुझं माझ्या आयुष्यातलं अस्तीत्व कायम टिकाव म्हणून त्या विधात्याकडे सतत भीक मागायचो.  पण नियतीच्या मनात एक वेगळंच होतं, "स्वस्थ बसून देणार! ती नियती कसली?!"  तिला माझ्या मनाविरुद्ध वागण्यात फारसा रस आहे. कदाचित म्हणूनच तुझ्या इतका जवळ आलोय मी आणि तितकाच दूर चाललोय का... ?  खरं सांगू ... आता कितीही पोळलो ना तरी तुझा श्वास माझ्या देहपासून दूर करूच शकत नाही.  बघ माझ्या डोळ्यात एक थेंब भर ही वेदना नाही जाणवणार तुला. नको अशी खाऱ्यात पेटूस, तुला असं पाहायची सवय नाही मला. प्रश्न जर आपल्या प्रवासाचा आहे तर तो अनंतात ही निरंतर आहे. कदाचित एकेकाळी कल्पनेतच भेटलेले खरे चंद्र तारे आपल्या पाहुणचारासाठी वाट पाहत असतील. डोळे पुसून घे, जरा पाहून घे डोळ्यात माझ्या जस ने 

हमी आनंदाने पाहतेस तशीच.  ये जराशी बाहुपाशात हा चंदनाचा पलंग आतुरतेने वाट पाहतोय तुझी.  चुकून ही याला सरण बोलू नकोस!  कारण शेवट नाही गं आपल्या प्रेमाला नी प्रवाहाला.....! अशीच सोबत रहा "कविता ..... !"


शेवटच्या काही ओळी फक्त तुझ्यासाठी -

तुला निरंतर प्रत्येक शब्दात माळेन मी 

प्रतिबिंबात निळाईच्या असा वाहेन मी 


फक्त तुझाच 

कल्पक.....

टिप्पण्या

  1. अतिशय सुंदर आणि त्यापेक्षा अधिक हृदयस्पर्शी 😢👌👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. अप्रतिम वाक्य रचना. आणि हृदयस्पर्शी

    उत्तर द्याहटवा
  3. कल्पक ची कल्पना रम्याता खूप छान वाटली. तरुणाईला आवडेल असा सुंदर विषय. उत्कट प्रेमाची प्रचिती देणारा.
    अप्रतिम........
    Simply fantastic!!!!!!

    उत्तर द्याहटवा
  4. खूपच छान ... अप्रतिम आणि सुरेख लेखन.......

    उत्तर द्याहटवा
  5. हृदयस्पर्शी , अप्रतिम लेखन, पुढील लेखनास शुभेच्छा!

    उत्तर द्याहटवा
  6. 1 no.
    सुरेख मांडणी...
    शब्दरचना #जबरदस्त......

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

लोकप्रिय पोस्ट